समाजशील न्युज नेटवर्क,शिक्रापूर,शिरुर (प्रतिनिधी,राजाराम गायकवाड) – शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन यांच्या वतीने १ जानेवारीच्या दरम्यान कोणीही मोबाईलवर वादगस्त विधान करु नये असे आवाहान शिक्रापूरचे पोलिस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांनी केले आहे.१ जानेवारीला शेकडो नागरिक विजय स्तभाला आभिवादन करण्यासाठी कोरेगाव भिमा येथे येत असतात .प्रत्येक नागरिकानी सोशल मिडिया व फेसबुक इस्टाग्राम.व्हाटसप गुप .इतर माध्यमातून कोणतेही वादगस्त विधान.कोणत्याही व्यक्ती च्या वंशाच्या.जातीच्या धर्माच्या .वर्णाच्या भावना दुखवतील अशा पोस्ट कंमेट.स्टोरी .स्टेटस.डिजीटल बँनर ठेवु नयेत. तरी व्हाटसप गुपचे अँडमिनया कालावधीत सेटींग मध्ये जाऊन ओन्ली ऍडमीन असा बदल करुन घ्यावा.जेणेकरुन कोणीही गुपवर पोस्ट टाकणार नाही .अँडमिन यानी सेटिंग मध्ये बदल केला नाही आणी एखाद्या व्यक्ती ने पोस्ट टाकली .त्यातुन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्या पोस्ट टाकणारा सदस्य व अँडमिन यांच्या वर कडक कार्य वाही करण्यात येईल असा इशारा ही पी आय गायकवाड यांनी दिला आहे.
Home शिक्रापूर १ जानेवारीच्या दरम्यान कोणीही मोबाईलवर वादगस्त विधान करु नये – पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड

१ जानेवारीच्या दरम्यान कोणीही मोबाईलवर वादगस्त विधान करु नये – पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड
BySamajsheelDecember 25, 20240
Previous Postयुवा क्रांतीच्या नाशिकच्या दोन भगिनींचा गौरव - जागो ग्राहक जागो उपक्रमात उल्लेखनीय सहभाग
Next Postकोंढापुरी येथील पुलावरील तुटलेल्या कठड्याची तात्काळ दुरुस्ती करा - प्रवाशांतून मागणी