समाजशील न्यूज नेटवर्क,आडगाव,नाशिक (देवकीनंदन शेटे,संपादक) – राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधत ग्रह संरक्षण समितीच्या वतीने आज नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथे जिल्हास्तरीय निबंधाक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वयोमानानुसार गटांची विभागणी केली होती. खुल्या गटातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या युवा क्रांती संघटनेच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षा जयश्रीताई अहिरे यांना त्या सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच निबंध स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र,ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले तर युवा क्रांती,पोलीस मित्र संघटनेच्या नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षा प्रियंका मुरकुटे यांना देखील त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य व या स्पर्धेत सहभागाबद्दल खुल्या गटात प्रमाणपत्र,ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यापरधेत शालेय मुली देखील सहभागी झाल्या होत्या.त्यांनाही सन्मानित करण्यात आले.

युवा क्रांती संघटनेच्या या दोन भगिनींना मिळालेल्या या पुरस्काराने संघटनेच्या कार्याचा गौरव वाढला असून या दोन्ही भगिनींचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,हभप नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे ,नानासाहेब बढे,शिवाजीराव शेलार,किरण वाघमारे,डॉ.राजेश्वर हेंद्रे,मंगलताई सासवड,मीनाताई गवारे सुदामभाऊ रणदिवे ,जयश्री इंगळे,जयश्री गावित,अमृतताई पठारे,वसुधा नाईक,वर्षा नाईक,संगीता रोकडे,वैशाली बांगर,प्रियांका शेलार,धुळ्याच्या शबाना शेख,श्रीवास्तव सर,दीपक पाटील,आनंदराव पगार,किरण बेंडाळे,अमर पठारे व राज्यातील पोलीस मित्र, राष्ट्रीय किसान विकास मंच संघटनेतील राष्ट्रीय,राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी अभिनंदन करीत पुढील त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.