समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड ग्रामीण रूग्णालयात आज पासून अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त असे 5 बेडचे डायलीसीस सेंटर सुरू करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरू होत असल्याची माहिती मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली. रूग्ण्यालयात सुरू करण्यात आलेले डायलिसिस सेंटर हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे असून, या ठिकाणी एकावेळी 5 रुग्णनां उपचार घेणे सहज शक्य होणार आहे. रूग्णालयात सुरू झालेल्या डायलिसिस सेंटरमुळे मुरबाड व तालुक्यातील रुग्णांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तसे पाहिले तर मुरबाड हे अतिशय दुर्गम आणि आदिवासीं भागात येणारे ठिकाण असल्याने या ठिकाणांहून रुग्णांना डायलिसिस साठी इतरत्र दुर पर्यंत जाऊन उपचार घ्यावे लागत असत, मात्र आत्ता मुरबाड मधेच हे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर उभा राहिल्या मुळे रुग्णांची होणारी हेळसांड आता पूर्णपणे थांबणार आहे.
रुग्णालयातील डायलिसिस सेंटर मध्ये मोफत डायलिसिस होणार असून, या विनामूल्य डायलिसिस सेवेचा लाभ गरजू रुग्णांनी घ्यावा असे आव्हान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून किडणी विकार तज्ञ डॉ. अनिकेत, जगन्नाथ, डॉ.संग्राम डांगे, डॉ.सुनील विश्वकर्मा, सहाय्यक अधीक्षक माणिक गायकवाड, परीसेविका जयश्री चौधरी तसेच रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.