समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड तालुक्यातील डोंगरन्हावे येथील एका शेतकऱ्याच्या भात पिकाचे रान डुकरांनी मोठ्याप्रमाणात नुकसान केल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणत शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या प्रकारामुळे पीडित शेतकरी हवालदिल झाला आहे. तुकाराम जगन खुणे असे पीडित शेतकऱ्याचे नाव असून खुणे यांनी २० गुंठ्यांत भात पिकाची लागवड केली होती. मात्र रात्रीच्या सुमारास रान डुकरांनी शेतात हैदोस माजवून अवघा हातातोंडाशी आलेला पीक मातीमोल केला आहे. सकाळी भात कापणी साठी शेतात आले असता शेतातील दृश्य पाहून खुणे कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. आधीच अस्मानी संकटाला तोंड देत असतांना त्यात वन्य प्राण्यांच्या अशा हैदोसामुळे शेती व्यवसायावर मोठी अवकळा पसरली आहे. तर वन विभागाने या रान डुक्करांचा बंदोबस्त करावा तसेच संबंधित प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी पीडित शेतकरी कुटुंबाने केली आहे.
Previous Postमुंजाळवाडी शाळेत दिवाळी सुट्टीत चोरी - सुमारे पंधरा हजार रुपयांचे साहित्य चोरीस
Next Postमुरबाड ग्रामीण रुग्णालयात 5 बेडचे डायलेसेस सेंटर सूरु ; मोफत सुविधा मिळणार