कवठे येमाईच्या सरपंच पदी मनिषा पांडुरंग भोर यांची बिनविरोध निवड – कवठे गावतून जल्लोषात मिरवणूक 

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील एक मोठी लोकसंख्या असलेल्या कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा पांडुरंग भोर यांची बिनविरोध निवड झाली. माजी सरपंच ज्योती मुंजाळ यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी गुरुवारी दि. १७ ला हा पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी मनीषा भोर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. फलके यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव, ग्रामपंचायत अधिकारी चेतन वाव्हळ यांनी निवडणूक कामकाज पाहिले. सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर मनिषा भोर यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार व गावातून भंडारा,गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक संपन्न झाली.यावेळी गावचे आजी-माजी सरपंच, सदस्य, ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds