अँड.संजय सावंत (पाटील) यांची महावितरण (MSEDCL) वकील पॅनल वर कायदेशीर सल्लागार पदी निवड

320
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ( MSEDCL) वकील पॅनल वर अँड. संजय दत्तात्रय सावंत यांची सल्लागार पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. महावितरणने वकील पॅनल करीता ठरवून दिलेल्या अटी व नियमांची पूर्तता अँड संजय सावंत यांनी अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्राद्वारे केल्याने   महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सर्व कागदपत्राची पडताळणी करून तसेच अँड सावंत यांचा अनेक वर्षाचा कामाचा अनुभव पाहून त्यांची कायदेशीर सल्लागार पदी आधिकृतपणे निवड केली आहे.अँड संजय सावंत पाटील यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,जगदंब सामाजिक प्रतिष्ठान, येसूबाई सामाजिक प्रतिष्ठान येथे जवळपास ४ वर्ष पेक्षा जास्त वर्ष कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात मध्ये असलेल्या पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वरती मोफत कायदेशीर सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत.अँड.सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात अनेक वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत.
          पुणे विभागाच्या अधिकारी लीगल अँडव्हायजर (I/C) असलेल्या नितल हसे यांनी ऍड सावंत यांना त्यांच्या निवडीचे आधिकृत पत्र नुकतेच दिले.महावितरणच्या पॅनल अँडव्होकेट म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अँड. संजय दत्तात्रय सावंत (पाटील) यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड चे महाराष्ट्र राज्याचे संचालक राजेंद्र पवार, वरिष्ठ अधिकारी (CLA) आर.आर. गांधी,  पुणे परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनिल  काकडे, असिस्टंट लॉ ऑफिसर दिनकर तिडके, पुणे विभाग महावितरण कार्यालयचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *