महा एनजीओ फेडरेशन तर्फे पुण्यात ‘नागरी समस्या निवारण केंद्र’ सुरू ; नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

23

समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे – (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) : सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने पुण्यात “नागरी समस्या निवारण केंद्र” सुरू करण्यात आले असून,या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नागरिकांच्या जीवनातील विविध नागरी तसेच वैयक्तिक कायदेशीर समस्यांचे मार्गदर्शन व निराकरण करण्यासाठी हे केंद्र कार्यरत राहणार आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.हे केंद्र दर आठवड्याला बुधवार व शनिवार या दोन दिवशी सुरू राहणार असून, दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत नागरिकांना सेवा उपलब्ध होणार आहे.या केंद्राचे ठिकाण महा एनजीओ फेडरेशन,कार्यालय क्र. ०८, सुजय गार्डन कमर्शियल कॉम्प्लेक्स,मुकुंद नगर,पुणे – ४११०३७ असे आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९७६६९९१९८८ / ९७३०६७३८५८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामध्ये श्री. चेतन शर्मा हे समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करणार असून, संस्थापक शेखर मुंडडा यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडून त्यावर मार्गदर्शन मिळवावे, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महा एनजीओ फेडरेशनतर्फे करण्यात आले आहे.दर बुधवारी व शनिवारी नियमितपणे हे केंद्र सुरू राहणार असून, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *