NEWS
Search

पुण्यात श्री सद्गुरू शंकर महाराज प्रकटदिन सोहळा उत्साहात साजरा होणार;  १७ नोव्हेंबरला भव्य नगरप्रदक्षिणा व पालखी सोहळ्याचे आयोजन!

48

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्यनगरीचे शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनकवडी येथील श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य नगरप्रदक्षिणा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट पुणे अध्यक्ष श्री राजाभाऊ रेवडे व श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट आरोग्य कक्ष प्रमुख डॉक्टर दिनेश रंगरेज यांनी दिली.
दि. १७ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिक शुद्ध अष्टमी (दुर्गाष्टमी) या शुभदिनी होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी कोल्हापूर येथील परमपूज्य सद्गुरू श्री. गंगाभूत महाराज यांची प्रार्थनीय उपस्थिती लाभणार आहे.श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती (ट्रस्ट) यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनकवडी, पुणे-सातारा रोड, पुणे येथील संस्थेच्या स्थळी हा धार्मिक सोहळा पार पडणार आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *