समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील वाढती गुन्हेगारी, गोळीबार,अवैध धंदे,अमली पदार्थांची समस्या,महिला व अल्पवयीन मुलींची सुरक्षितता तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या संरक्षणा संदर्भातील गंभीर प्रश्नांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दखल घेतली आहे.सामाजिक कार्यकर्ते व व्हिसलब्लोअर निलेश मंदा यशवंत वाळुंज, घोडनदी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. उदय सरोदे आणि ॲड. राहुल वाघचौरे यांनी मुंबई येथे पोलीस महासंचालकांची नुकतीच भेट घेऊन शिरूर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती मांडली.
या भेटीदरम्यान मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांची दखल घेत पोलीस महासंचालकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांना शिरूर तालुक्यातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक सुधारणा व प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासंदर्भातील अहवाल सहा आठवड्यांत सादर करण्यास सांगितले आहे.पोलीस प्रशासनातील उत्तरदायित्व, निष्पक्ष तपास, सक्षम पोलीस नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचे मुद्देही यावेळी उपस्थित करण्यात आले.आता शिरूर तालुक्यात पोलीस प्रशासनात नेमके कोणते बदल होणार, गुन्हेगारीवर आळा बसणार का आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Home बातम्या पुणे शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची पोलीस महासंचालकांकडून गंभीर दखल ! पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश; प्रशासकीय बदलांचे संकेत

शिरूरच्या कायदा-सुव्यवस्थेची पोलीस महासंचालकांकडून गंभीर दखल ! पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना सहा आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश; प्रशासकीय बदलांचे संकेत
BySamajsheel NewsNovember 16, 20260
