NEWS
Search

सिताबाई थिटे कॉलेजमध्ये राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ उत्साहात संपन्न!

30

 समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर येथे २ नोव्हेंबर रोजी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन, आळेफाटा लोकल ब्रँच आणि नॅशनल फार्मसी वेल्फेअर असोसिएशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘फार्मा आयडियाथॉन २०२६’ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत राज्यातील ३९ फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत नावीन्यपूर्ण फार्मा मॉडेल्स सादर केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र थिटे, सचिन कोतवाल, बाबाजी गलांडे, डॉ. अमोल शहा आणि डॉ. सचिन कोठवदे यांच्या उपस्थितीत झाले. विद्यार्थ्यांनी स्मार्ट ड्रग डिलिव्हरी, नियंत्रित औषधमुक्तता आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर आधारित संशोधनपर मॉडेल्स सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
बी.फार्मसी व एम.फार्मसी विभागात समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे येथील अश्विनी भोर व प्रतिभा गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तर डी. फार्मसी विभागात के बीएचएस ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील पीयूष निकम व पंकज कापसे यांनी प्रथम क्रमांक मिळवला.विजेत्यांना रोख पारितोषिके,प्रमाणपत्रे व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, आयोजन समिती व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सहभागी विद्यार्थ्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *