समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरुरच्या बेट भागातील टाकळी हाजी पोलीस चौकीत चौकशीसाठी बोलावून एका शेतकऱ्याला मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप पोलीस एका उपनिरीक्षकावर करण्यात आला आहे.या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
टाकळी हाजी येथील रावसाहेब सुखदेव घोडे (वय ३४) यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार ३१ ऑक्टोबर रोजी शेतीच्या वादातून त्यांच्या चुलतभावाच्या कुटुंबीयांशी वाद झाला होता. दोन्ही बाजूंनी पोलीस चौकीत तक्रार दिल्यानंतर मध्यस्थीने वाद मिटवण्यात आला होता.त्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी हवालदार वायाळ यांनी फोन करून घोडे यांना चौकशीसाठी पोलीस चौकीत बोलावले. तेथे उपनिरीक्षक गोविंद खटिंग यांनी दमदाटी करून मारहाण केली, मोबाईल हिसकावून घेतला, शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप घोडे यांनी तक्रारीत केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी ही अपमानास्पद वर्तन झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

विशेष म्हणजे, संबंधित उपनिरीक्षकाची घटनेपूर्वीच अन्यत्र बदली झाली होती, असा दावा तक्रारदाराने केला आहे. त्यामुळे बदली आदेश, कार्यमुक्तीची तारीख आणि चौकशी करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना होता का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली आहे.
आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात आणि चौकशीतून नेमके काय समोर येते, याकडे टाकळी हाजी सह बेट परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.