समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी (गावडे मळा) येथे जमिनीच्या वादातून मारहाणीची घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार बाळू गावडे (वय २२, रा. टाकळी हाजी) हे २३ एप्रिल रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह जुने घर पाडून साहित्य काढण्यासाठी गेले असता आरोपी सुजित रमेश गावडे,अमित महादू गावडे व सुमित रमेश गावडे यांनी त्यांना अडवले. यावेळी वाद होऊन सुजित गावडे यांनी फिर्यादीला ट्रॅक्टरवरून खाली ओढले, तर सुमित गावडे यांनी लाकडी काठीने डोक्यात मारहाण केली.
फिर्यादीच्या मदतीसाठी आलेल्या आई-वडील व भावालाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

टाकळी हाजी येथे जमिनीच्या वादातून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
BySamajsheel NewsApril 25, 20260
Previous Postचांडोह येथे हातभट्टी दारू जप्त; आरोपी फरार तर दुसऱ्या घटनेत बेकायदा दारू साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल
Next Postजातेगाव खुर्द येथे ३३/२२ केव्ही विद्युत उपकेंद्रास मंजुरी; ११.११ कोटींची तरतूद : माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची माहिती
