समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील जातेगाव खुर्द परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत नवीन ३३/२२ केव्ही विद्युत उपकेंद्रास अखेर मंजुरी मिळाली आहे. या उपकेंद्रासाठी ११ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असल्याची माहिती राज्याचे माजी सहकार मंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
या उपकेंद्रासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकल्पामुळे जातेगाव खुर्दसह परिसरातील वीज वितरण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे.नवीन उपकेंद्रांतर्गत ३३ केव्ही व २२ केव्हीच्या स्वतंत्र उच्चदाब (एचटी) लाईन्सचे जाळे उभारण्यात येणार असून, त्यामुळे वीजपुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होईल. तसेच हे उपकेंद्र आधुनिक ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टम’ने सुसज्ज असणार असल्याने तांत्रिक बिघाड तात्काळ शोधून त्यावर कार्यवाही करणे सुलभ होणार आहे.सध्या परिसरात कमी दाबाने वीज मिळणे, वारंवार खंडित होणारा पुरवठा अशा समस्या नागरिकांना भेडसावत होत्या. या उपकेंद्रामुळे त्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.“जातेगाव व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंडित वीजपुरवठा मिळावा, हा आमचा प्रयत्न आहे. या उपकेंद्रामुळे त्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे,” असे मत माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केलेआहे.
Home पुणे जातेगाव खुर्द येथे ३३/२२ केव्ही विद्युत उपकेंद्रास मंजुरी; ११.११ कोटींची तरतूद : माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची माहिती

जातेगाव खुर्द येथे ३३/२२ केव्ही विद्युत उपकेंद्रास मंजुरी; ११.११ कोटींची तरतूद : माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची माहिती
BySamajsheel NewsApril 24, 20260
