समाजशील न्यूज नेटवर्क.शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड झाली असून राष्ट्रीय मीडिया प्रमुख व राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार पदांची व्यतिरिक्त जबाबदारी ही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.पोलीस मित्र संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शाम व्यंकट घाडगे यांनी आज मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली.
प्रा. सुभाष अण्णा शेटे हे पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि जनहिताच्या प्रश्नांवर मागील २० वर्षांपासून सातत्याने कार्यरत आहेत. पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार विभागाच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न, सामाजिक समस्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे कार्य करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नियुक्ती पत्रात संघाच्या ध्येय धोरणा नुसार कार्य करणे, संघटनात्मक नियमांचे पालन करणे, संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे आणि दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करणे,असे आवाहन अध्यक्ष घाडगे यांनी केले आहे.
या नियुक्तीमुळे प्रा. सुभाष अण्णा शेटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग संघटनेच्या विस्तारासाठी, पत्रकारांच्या हित संरक्षणासाठी आणि सामाजिक कार्याला अधिक गती देण्यासाठी होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
लाभलेल्या पदाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी आणि जनहिताच्या कार्यासाठी करण्याचा संकल्प प्रा. सुभाष अण्णा शेटे यांनी अधिक जोमाने पुढे न्यावा, अशा त्यांना पुढील वाटचालीसाठी शिरूर तालुका पोलीस मित्र संघाच्या सर्वच सदस्य पदाधिकाऱ्यांकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
Home बातम्या पुणे प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची पोलीस मित्र संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रीय मीडिया प्रमुख व राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार पदाची ही अतिरिक्त जबाबदारी!

प्रा. सुभाष अण्णा शेटे यांची पोलीस मित्र संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती; राष्ट्रीय मीडिया प्रमुख व राष्ट्रीय ज्येष्ठ सल्लागार पदाची ही अतिरिक्त जबाबदारी!
BySamajsheel NewsOctober 13, 20260
Previous Postपोलीस मित्र संघाच्या वतीने वर्षाताई नाईक यांची राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी नियुक्ती
Next Postज्येष्ठांच्या निरोगी आयुष्यासाठी धामारी त आरोग्याचा जागर; तपासणीसोबत दिला ‘दहा सूत्री मंत्र’
