जुन्नर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – जुन्नर तालुक्यातील चिंचोली येथील वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ते नामदेव मारूती ताजणे यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दि. १८ निधन झाले. युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे जुन्नर तालुका अध्यक्ष नवनाथ ताजने यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. नामदेव मारूती ताजणे यांच्या निधनाबद्दल युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,हभप नाना महाराज कापडणीस,शिवाजीराव शेलार,डॉ.राजेश्वर हेंद्रे,नानासाहेब बढे, राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष अण्णा शेटे, युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण माहितीअधिकार संघटनेचे राज्यातील सर्वच सहकारी, पदाधिकारी यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली आहे.