सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या तीन शिलेदारांसह ५ जणांचा गौरव – पुण्याच्या काव्य योग काव्य संस्था,वसुधा इंटरनॅशनल,भारतीय विचारधारा यांचा उपक्रम 

211
  समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या तीन शिलेदारांसह ५ जणांचा नुकताच पुणे येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  पुण्याच्या काव्य योग काव्य संस्था,वसुधा इंटरनॅशनल,भारतीय विचारधारा यांच्या संयुक्त उपक्रमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. या निमित्ताने युवा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. वसुधा इंटरनॅशनल च्या संस्थापिका व अध्यक्षा वसुधाताई नाईक यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
       काव्ययोग काव्य संस्था,वसुधा इंटरनॅशनल,भारतीय विचारधारा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यावेळी पुस्तक प्रकाशन सोहळा, बक्षीस वितरण व युवा कवी संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.भारती महाडिक,भारतीय विचारधारा अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले. तर उपस्थितांचे स्वागत सौ.वसुधा ताई नाईक यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा शरदचंद्र काकडे देशमुख हे होते. कार्यक्रमास विशेष उपस्थिती अभिनेता महेश रोहिणी कवी संमेलन अध्यक्ष, लावणीकार श्रीशैल सुतार ,प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक जयप्रकाश झेंडे,तसेच युवा गझलकार गिरीश जंगमे या मान्यवरांची लाभली. तर यावेळी तुषार पालखे ,पल्लवी पवार संपादित केलेले मर्म या प्रतिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.तसेच कवयित्री लिना पांडे लिखित यांच्या जीवन अमृत कवितेच्या मुख पृष्ठाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यात बालकवी यांचे ही कवी संमेलन पार पडले.विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न झाले. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकारी शिवहरी जंगले, युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार, युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी वर्षाताई नाईक, दीपाराणी गोसावी यांना सामाजिक गौरव पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.काव्य संमेलनात तब्बल ३५ युवा कवींनी सहभाग घेतला होता.पूर्ण महाराष्ट्रातून युवा कवींनी हजेरी लावली होती.काही कवितांनी,गझलानी रसिक वर्गाची मने जिंकली.प्रत्येक कवीला रसिकांची दाद मिळत होती.एका पेक्षा एक कविता या युवा कवींनी सादर केल्या.हे कवी संमेलन आनंदाने आणि उत्साहाने पार पडले.सादर केलेल्या युवा कवीना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन काव्ययोग काव्य संस्था पुणे अध्यक्ष मा.योगेश हरणे ,काव्ययोग काव्य संस्था पुणे उपाध्यक्ष मा.गौरव पुंडे ,पल्लवी पवार,मयुरी लायगुडे,श्रीराम घडे,गौरी महाजन ,तुषार पालखे यांनी उत्कृष्टपणे केले.युवा कवी संमेनाचे सूत्रसंचालन सौ.राजश्री वाणी मराठे तसेच मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी आपल्या निवेदनातून मनोरंजन केले.आभार प्रदर्शन सौ. भारती महाडिक यांनी केले.
        युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेतील ज्या शिलेदारांचा गौरव झाला त्यांचे युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,हभप नाना महाराज कापडणीस,जयश्रीताई अहिरे,अमृतताई पठारे,नानासाहेब बढे,राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष अण्णा शेटे, युवा क्रांती पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण माहिती अधिकार संघटनेचे सर्वच राष्ट्रीय पदाधिकारी व राज्यातील सर्वच सहकारी,पदाधिकारी यांनी वरील सर्वांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds