समाजशील न्यूज नेटवर्क,धुळे, (सा.समाजशील वृत्तसेवा) :- संघटनेची ध्येय धोरणे व कार्य पद्धतीचा सनदशीर व योग्य मार्गाने अवलंब करीत समाजातील अडचणीत असलेल्या व्यक्तीना शक्य होईल ती मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने संघटनेतील विविध पदाधिकारी,सदस्य कायमच पुढाकार घेऊन ते ही निस्वार्थपणे मदतीचा हात देत असल्याने अल्पावधीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेल्या युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र,ग्राहक,पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटने बाबत एक योग्य त्या मदती विषयी सर्वसामान्यांमध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. कार्य कुठलेही असो मग संघटनेतील पदाधिकारी सदस्य जोमाने व प्रामाणिकपणे ते सोडविण्यासाठी मदतीचा हात पुढे करीत समस्यांचे समाधान करताना दिसत आहेत.
असाच एक सामाजिक मदतीचा प्रत्यय काल दि. १६ ला धुळे येथे पाहावयास मिळाला. युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव असलेल्या धुळे येथील शबाना शेख व संघटनेतील त्यांच्या सहकारी महिला सदस्य,पदाधिकारी मनीषा सोलंकी,सुरेखा माने,आशा छत्रे यांनी सामाजिकतेचे भान ठेवत केलेले कार्य निश्चित च संघटनेच्या बाबतीत व संघटनेतील इतर सदस्य,पदाधिकारी यांना प्रेरणादाई व आदर्शवत असेच आहे.
मनात एखादे सामाजिक कार्य करायचे व ते ही मनापासून हा निश्चय दृढ असला कि, हाती घेतलेले कार्य नक्कीच पूर्णत्वास जाते.धुळे येथील पोलीस मित्र संघटनेच्या शबाना शेख,मनीषा सोलंकी,सुरेखा माने,आशा छत्रे यांनी येथील सिविल हॉस्पिटल येथे जाऊन डॉक्टरांची परवानगी घेऊन रुग्णालयातील ४ वॉर्ड मध्ये स्वच्छता अभियान राबवले. प्रत्येक वार्डात जाऊन उपस्थित नागरिकांना,रुग्णांना स्वच्छते विषयी माहिती पत्रक देत परिपूर्ण माहिती दिली. ओला व सुका कचरा वेगळे करण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. सध्या परिसरात डेंगू,मलेरियाची पण साथ चालू आहे याविषयी नागरिकांनी काय दक्षता घ्यावी या बाबतही माहिती दिली तर युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या शबाना शेख,मनीषा सोलंकी,सुरेखा माने,आशा छत्रे या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात येऊन स्वेच्छेने केलेल्या सामाजिक कार्याबद्दल तेथील रुग्णालय व्यवस्थापन,डॉक्टर,परिचारिका ,कर्मचारयांनी या सर्व महिलांचे आभार मानत त्यांना धन्यवाद दिले.
युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव असलेल्या धुळे येथील शबाना शेख व मनीषा सोलंकी,सुरेखा माने,आशा छत्रे या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कौतुकास्पद सामाजिक मदत कार्याबद्दल संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,तक्रार समितीचे अध्यक्ष हभप नाना महाराज कापडणीस,डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्री ताई अहिरे,संघटनेचे महाराष्ट्र र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख,मार्गदर्शक तथा राष्ट्रीय किसान मंच चे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,संघटनेचे पदाधिकारी शिवाजीराव शेलार,नानासाहेब बढे,व सर्वच राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.