समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – आजच्या डिजिटल युगात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून मुलांनी विशेष करून शालेय विद्यार्थ्यानी मोबाईल,सोशल मीडिया पासून दूर रहावे व गड किल्ल्यांचे संवर्धन व ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपण्याचे कळकळीचे आवाहन कवठे येमाई तालुका शिरूर येथील सिने कथा,पटकथा लेखक कवी मोहनराव पडवळ यांनी केले.ते आज कवठे येमाई येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री येमाई माता सामाजिक शैक्षणिक क्रीडा संघ, एस क्लब मार्फत आयोजित नुकत्याच झालेल्या दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धकांना बक्षिसे वाटप प्रसंगी उपस्थित स्पर्धक,ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
सामाजिक व विधायक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारा श्री यमाई माता सामाजिक शैक्षणिक क्रीडा संघ व एस क्लब मार्फत २०२५ ची किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला.एस क्लबने मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून राबविलेला व आपल्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारश्याची माहिती सर्वश्रुत व निरंतर रहावी या उद्देशाने सुरु केलेला हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असल्याचे पडवळ यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस वितरण समारंभ आज येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमास उपस्थितांना येथीच श्री नवज्योत कला,क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष,गावाचे भूषण मराठी सिनेमा लेखक मोहनराव पडवळ यांनी मुलांना व उपस्थित सर्वांना सध्याच्या वाढते तंत्रज्ञान मोबाईल सोशल मीडिया यापासून लांब राहून मुलांनी गड किल्ल्यांचे संवर्धन व ऐतिहासिक सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपण्याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी क्लबचे सचिव सेवानिवृत्त प्राचार्य संजयनाना चौधरी,डॉ.संतोष उचाळे,विनायकराव गोसावी,नवनाथ सांडभोर,निलेश पोकळे,संदीप वागदरे,राकेश बोरा,सोपान वागदरे,सोन भाऊ पोकळे,धनंजय साळवे व अनेक मान्यवर ग्रामस्थ व श्री स्वामी नरेंद्र महाराज सेवेकरी उपस्थित होते.




