कृषी विभागाचे महाविस्तार ए आय मोबाईल अँप शेतकऱ्यांच्या दृष्टीने मार्गदर्शक – सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव 

306
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुरु केलेले ए आय अँप अत्यंत फायदेशीर असून शेतकऱ्यांनी आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये डाउनलोड करून घ्यावे व शेती साठी मार्गदर्शनपर मिळणाऱ्या सेवा सुविधांचा फायदा करून घ्यावा असे आवाहन कवठे येमाई कृषी विभागाचे सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी केले आहे. ते काल शिरूर तालुक्यातील थिटेवाडी,सुक्रेवाडी केंदूर येथे महाविस्तार ए आय अँप संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी परिसरातील सुमारे २०० महिला,पुरुष शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप संभाजी महाराज थिटे हे होते. तर सुक्रेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते संदीप सुक्रे हे होते.
      यावेळी उपस्थित शेतकऱयांना शासनाच्या कृषी विभागांतर्गत महाविस्तार ए आय अँप संदर्भात माहिती देताना नंदू जाधव म्हणाले कि,शासनाच्या कृषी विभाग मार्फत सुरु करण्यात आलेले हे महाविस्तार ए आय अँप शेतकऱ्यांच्या दृष्टीने मार्गदर्शनपर व  किफायतशीर ठरणार असून याद्वारे शेतकऱ्यांना खतांचे अचूक गणित,माती व पिकानुसार शिफारस,हवामान अंदाज पिकनिहाय मार्गदर्शन, पेरणी ते काढणी,कीड व रोग संरक्षण-उपाय योजना एका क्लिकवर,चॅटबोट द्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तात्काळ उत्तरे, चलित बाजारभाव  – जवळच्या बाजारातील माहिती,डिजिटल फार्म स्कूल – विडियो व ऑनलाइन माहिती जलदगतीने मिळणार असून शासनाच्या या महाविस्तार ए आय मोबाइल अँप  (ज्ञानाचा साथी-शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी) चा शेतकऱ्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन ही सहायक कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे. 
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds