समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे – (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पोलीस मित्र संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पुणे, धनकवडी येथील वरिष्ठ जनसेविका श्रीमती वर्षाताई नाईक यांची संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचे संस्थापक व अध्यक्ष मा. श्री. शाम तुकाराम घाडगे यांनी आज मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तिपत्र प्रदान केले.
श्रीमती वर्षाताई नाईक या सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचे मोठे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस मित्र संघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे महिला सक्षमीकरणाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, तसेच संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नियुक्ति पत्रात संघटनेची ध्येय धोरणे पुढे नेण्यासाठी, वेळोवेळी दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करण्यासाठी आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन अध्यक्ष शाम घाडगे यांनी केले आहे.श्रीमती वर्षाताई नाईक यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अध्यक्ष शाम घाडगे,उपाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे,प्रफुल्ल गवंडी साहेब,उद्योगपती समीर नाईक,श्रीकांत अष्टेकर शिरूर,पुणे शहर टीम व सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, पुढील सामाजिक वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६