राजेंद्र नाथा निचित या शेतक-याची कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने कंटाळून आत्महत्या ,शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील घटना

780
         कवठे येमाई,पुणे : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील राजेंद्र नाथा निचित वय ४० या शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणा व शेतमालाला भाव मिळत नसल्याने कंटाळून किटकनाशक घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
         याबाबत राजेंद्र यांची आई गंगुबाई निचित यांनी  सांगितले की, माझा मुलगा  राजेंद्र हा शेतमालाला  बाजारभाव मिळत नसल्याने आणि पिकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाच्या कर्जामुळे चिंतेमधे होता. शेतीसाठी काढलेले बँक व सोसायटीचे कर्ज  व नातलगांकडून घेतलेले हातउसने पैसे कसे द्यायचे या विवंचनेतच त्याने  शनिवारी शेत पिकासाठी आणलेले किटकनाशक औषध स्वतः प्राशन केले हे समजताच राजेंद्र यांचे चुलत भाऊ मच्छिंद्र निचित हे त्यांना मंचर येथे शासकीय रुगनाल्यात घेऊन गेले, तेथुन डॉक्टरांनी त्यांना पिंपरी येथील वाय.सी.एम रुगनालयात पाठविले.तेथील डॉक्टरांनी प्रयत्न करूनही राजेंद्र याला वाचविण्यास अपयश आले, सोमवारी रात्री त्यांचे रूग्नाल्यात निधन झाले.काल मंगळवारी वडनेर खुर्द येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात राजेन्द्रावर अंत्य संस्कार करण्यात आले.
         वडनेर खुर्द येथील शेतकरी राजेंद्र निचित यांची पावणे दोन एकर जमीन तर राहायला छोटेसे पण पडगळीस आलेले घर असुन, आई, पत्नी व दोन लहान मुले असा परीवार आहे.त्यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. शेतामधे कांद्याबरोबर इतर भाजीपाला पिक ते घेत होते.राजेंद्र यांच्या वडिलांनीही काही वर्षांपूर्वी कर्जबाजारी पानांमुळे आत्महत्या केल्याची माहिती मिळाली असून राजेंद्र ने ही कर्जाच्या विवंचनेत कीटकनाशक घेत आत्महत्या केल्याने या कुटुंबाचा आधारच नष्ट झाला आहे. शासनस्तरावरून तातडीने या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात मिळण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.तर या घटनेची माहिती शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले,गटविकास अधिकारी संदीप जठार यांना दिली असता शासन स्तरावरून जी काही मदत या आत्महत्या ग्रस्त शेतक-याच्या कुटुंबास मिळवून देता येईल ती नक्की देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले यांनी देखील बँकेच्या माध्यमातून ही या कुटुंबाला शक्य होईल ती मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.
–  सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *