समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर- आंबेगावचे आमदार माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या ४५/१५ अंतर्गत आमदार निधीतून शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणात आज दि. १३ ला दुपारी समस्त बाराभाऊ बलुतेदार मंडळाच्या समाजमंदिर इमारतीच्या कामास आज दुपारी तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी राजेंद्र पोपटराव गावडे,माजी आमदार गावडे यांचे कट्टर समर्थक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव मामा पोकळे,माजी ग्रामपंचायत सदस्य व धडाडीचे कार्यकर्ते रामदास रोहिले,उपसरपंच राजेंद्र इचके,अशोकराव गाडेकर,गणेशराव रत्नपारखी,राळे चेअरमन,मिठूलाल बाफना, राजेश सांडभोर,अशोक रेणके,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर,राजेश पोपळघट,बलुतेदार मंडळातील अनिकेत,सनी रेणके, पपू पठाण,अरुण रोकडे, बबन नाना शिंदे,कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री,आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून या भागात मोठी विकासात्मक कामे झाली असून भविष्य काळात ही गरज असेल ती समाज उपयोगी कामे प्राधान्याने करण्याचा प्रयत्न राहील असे आश्वासन यावेळी राजेंद्र गावडे यांनी उपस्थितांना दिले. तर सुजाण जनता कार्य करणाऱ्यांच्या नक्कीच सोबत राहते असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडभोर यांनी उपस्थितांना दिला.आगामी जिल्हा परिषद साठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेंद्र गावडे कवठे -टाकळी हाजी गटातून तर कांचन राजेंद्र सांडभोर या पंचायत समितीसाठी कवठे- मलठण गणातून उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. हा जिल्हा परिषद गट माजी आमदार पोपटराव गावडे यांचा बालेकिल्ला समजला जातो.



