NEWS
Search

या वर्षी मे च्या मध्यावरच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल लागणार – जेष्ठ हवामान शास्रज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती 

54
समाजशील न्युज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता पाहता मान्सून अंदमानात कधी येणार ? या विषयी शेतकऱ्यांसह उष्णतेने हैराण होत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता लागली आहे. तर या वर्षी मे महिन्याच्या मध्यावरच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल लागणार असल्याचे मत सेवानिवृत्त जेष्ठ हवामान शास्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहे.
         नैऋत्य  मान्सून, म्हणजे च भारतीय मान्सून (यंदाचा पावसाळा),वि्षुववृत्त समांतर,पूर्वेकडून पश्चिमेकडे, प्रशांत महासागरीय प्रवास करत,मलेशिया,सिंगापुर,सुमात्रा बेटाचा उत्तरेकडील भाग ओलांडून भारताच्या अंदमान व निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील आग्नेय बंगालच्या उपसागरात म्हणजे १० डिग्री उत्तर अक्षवृत्त व १०० डिग्री पूर्व रेखावृत्त दरम्यान, येत्या आठच दिवसात म्हणजे १३ मे दरम्यान मजल-दरमजल करत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे खुळे यांनी सांगितले. नैऋत्य मान्सून त्याच्या सरासरी तारखेच्या सहा दिवस अगोदर अंदमानात हजेरी लावण्याची शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.
अर्थात भारत महासागरीय परिक्षेत्रात मान्सूनने प्रवेश केला तरी भारताच्या भू -भागावर म्हणजे केरळात व त्यानंतर सह्याद्री ओलांडून महाराष्ट्रात लवकर येईल असेही समजू नये. कारण अंदमान ते केरळ हे साधारण दोन ते अडीच हजार किमी.अंतर कापून येण्यासाठी त्याचा बराच कालावधी लोटला जातो.फक्त मान्सून च्या ह्या आगाऊ गती-विधीमुळे त्या अगोदर पडणाऱ्या पूर्वमोसमी गडगडाटी पावसाला चालना मिळते असे ही खुळे म्हणाले.
साधारण १९ मे ला मान्सून अंदमान व निकोबार बेटावर व आग्नेय बंगालच्या खाडीत येतो.मागील सन २०२४, २०२३, २०२२ अशा तीन वर्षात लागोपाठ त्याच्या सरासरी तारखेला म्हणजे १९ मे, तर २०२१ ला २१ मे व २०२० ला १७ मे ला मान्सून अंदमानात पोहोचला होता.अवकाळी पावसाचे वातावरण व गारपीट संबंधी सांगायचे म्हटले तर  मराठवाड्यातही आज ७ व ८ मे ला अवकाळी च्या वातावरणाची शक्यता वाढली आहे.तर सध्याच्या तापमानाचा विचार केला तर कोकण ३३ ते ३५ डिग्री, मध्य महाराष्ट्र ३७ ते ४१, विदर्भ व मराठवाडा ३८ ते ४१ डिग्री असे तापमान आढळून येत आहे.कोकणातील ही तापमाने सरासरी तर उर्वरित महाराष्ट्रात ही तापमाने सरासरीच्या खाली असुन भर उन्हाळ्यात उष्णतेच्या तापेपासून महाराष्ट्राला सुसह्यताच मिळत असल्याचे मत माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे. तर महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा उष्णतेच्या लाटेची सध्या तरी कुठेही शक्यता जाणवत नसल्याचे ते म्हणाले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds