समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शासकीय स्वस्त धान्य दुकानातून शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता मोफत धान्याबरोबरच १४ प्रकारचे दैनंदिन आहारात लागणारे विविध प्रकारचे मसाले मात्र १०० रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील स्वस्त धान्य दुकानदार तथा तालुका रेशनिंग संघटनेचे शिरूर तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.त्यांच्या दुकानास आज मंगळवार दि. १३ ला भेट दिली असता तेथे मसाले पॅकिंगसाठी महिलांची झालेली गर्दी पाहून याबाबत दुकानदार रत्नपारखी यांना विचारले असता तालुक्यातील २५ गावातील सुमारे १० हजार शिधापत्रिका धारकांना वेळेत हे मसाले किट मिळावेत म्हणून जोरदारपणे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मसाले पॅकिंग मधून सुमारे १४ महिलांना रोजगार देऊ शकल्याचे ही त्यांनी सांगितले रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थे अंतर्गत १४० रुपये किमतीच्या १०० रुपयात १४ विविध प्रकारचे मसाले जिल्ह्ह्यातील काही तालुक्यात उपलब्ध करण्यात आले आहेत.शासन निर्णयानुसार उत्पादक ते थेट ग्राहक स्वच्छ,निवडक,किफायतशीर दरात या जीवनावश्यक वस्तूंची रेशन दुकानात उपलब्धता करून देण्यात आल्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ वचकल यांनी सा. समाजशील शी बोलताना सांगितले. शिधापत्रिका धारकांना या १४० रुपये मूळ किमतीच्या चांगल्या प्रतीच्या १४ मसाले वस्तू मात्र १०० रुपयात मिळत असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे कैलास फटांगडे यांनी सांगितले.ग्रामीण भागात बहुसंख्य शिधापत्रिका धारक हे शेतकरी,मजुरी,कामगार,गोरगरीब असून यात चांगल्या प्रतीच्या अधिकाधिक जीवनावश्यक वस्तू ग्राहकांना कंपनी ते थेट ग्राहक या तत्वावर व रास्त भावात रेशन दुकानदारांच्या शिखर संस्थे अंतर्गत उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी आग्रही मागणी युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जेष्ठ पत्रकार,प्राध्यापक सुभाष शेटे यांनी केली आहे.तर लवकरच आणखी काही ग्राहक नित्य उपयोगी वस्तु स्वस्त धान्य दुकानातून रास्त भावात उपलब्ध होत असल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले.
Home पुणे १४० रुपयांचे उंचच प्रतीचे १४ मसाले १०० रुपयात उपलब्ध : शिरूर तालुक्यात २५ गावांसाठी १० हजार मसाले किट : रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांची माहिती

१४० रुपयांचे उंचच प्रतीचे १४ मसाले १०० रुपयात उपलब्ध : शिरूर तालुक्यात २५ गावांसाठी १० हजार मसाले किट : रेशन दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांची माहिती
BySamajsheel NewsMay 13, 20250
Previous Postज्ञानगंगा विश्व विद्यालयाचा दहावीचा १००% टक्के निकाल
Next Postया वर्षी मे च्या मध्यावरच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल लागणार - जेष्ठ हवामान शास्रज्ञ माणिकराव खुळे यांची माहिती
