शिक्रापूर ( प्रतिनिधी:- राजाराम गायकवाड) : फेब्रु – मार्च बारावीच्या आज सोमवार ५ मे नुसार ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालात श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय जातेगांव बुद्रुक यांनी ग्रामीण परिसरात सर्वोत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे . एकूण ५७५ पैकी ५६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के विज्ञान शाखेचा ९९.४९ टक्के तर कला शाखेचा निकाल ९४ .६६ टक्के असा उल्लेखनिय लागला आहे . याबाबत आधिक माहिती देताना प्राचार्य रामदास थिटे म्हणाले , ” शिक्षकांचे नियोजनबद्ध वार्षिक अभ्यासक्रम नियोजन , तंत्रस्नेही ई- क्लास रूम अध्यापन , नीट , जेईई व राज्य सीईटी अभ्यासक्रमाचे घटकनिहाय मार्गदर्शन , अध्ययन निष्पत्ती घटक तसेच कला-वाणिज्य शाखांसाठी सातत्यपूर्ण चाचणी व निकाल विश्लेषण , सत्र व वार्षिक परिक्षांचे कालबद्ध आयोजन , विषय तज्ञ मान्यवरांची व्याख्याने , संस्था नियामक मंडळाचे शालेय नियोजन व प्रेरणा , पालकांचा विद्यालयीन गुणवत्तेबाबत सार्थ विश्वास, यामुळे हे यश प्राप्त झाले आहे .”
शाखानिहाय प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे –
विज्ञान शाखा –
प्रथम – शेंडगे अंकिता ज्ञानदेव ९३%
व्दितीय – पलांडे शौर्यमन राहुल ९०.८३%
तृतीय – साकोरे सोहम निवास ८२.६७%
शाखानिहाय प्रथम आलेले गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे –
विज्ञान शाखा –
प्रथम – शेंडगे अंकिता ज्ञानदेव ९३%
व्दितीय – पलांडे शौर्यमन राहुल ९०.८३%
तृतीय – साकोरे सोहम निवास ८२.६७%
वाणिज्य शाखा –
प्रथम – पटेल नंदिनी भरत ८१.८३%
द्वितीय – शिंदे प्रतीक्षा खंडू ७७.५०%
तृतीय- पाटील श्रेयश तानाजी ७५.५०%
कला शाखा –
प्रथम – भोसले गणेश जगदीश ७०%
व्दितीय – मांढरे धनश्री काळूराम ६४.१७%
तृतीय – मोरे श्रावणी काळूराम ६३.६७%
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष कांतीलाल उमाप, उपाध्यक्ष सुगंध उमाप, सचिव प्रकाश पवार व नियामक मंडळ यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे .