कवठे येमाई,पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांचा संचालक पदाचा राजीनामा, १३ महत्वाचे मुद्दे उपस्थित करीत कारखाना व्यवस्थापन योग्य काम करीत नसल्याचा आरोप

711

       कवठे येमाई,पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांचा संचालक पदाचा आज राजीनामा दिला असून १३ महत्वाचे मुद्दे आज त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित करीत  कारखाना व्यवस्थापन योग्य काम करीत नसल्याचा आरोप त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.

         न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक असलेले सुधीर फराटे यांनी कारखाना व्यवस्थानाला वेळोवेळी केलेल्या पञव्यवहारामुळे शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या बाबत काही महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले होते.संचालक सुधीर फराटे हे घोडगंगा कारखान्याच्या विरोधात सुरू असलेल्या संजय पाचंगे यांच्या आंदोलनाला आज पाठिंबा देतील अशीही चर्चा शिरूर तालुक्यात सुरू होती.परंतु आज सुधीर फराटे यांनी थेट पञकार परिषद घेत तब्बल १३ मुद्दे उपस्थित करत कारखाना व्यवस्थापन योग्य काम करित नसल्याचा आरोप करीत आपला संचालक पदाचा राजीनामा कारखान्याच्या कार्यकारी संचालकांकडे दिला आहे. तर घोडगंगा साखर कारखान्याच्या होत असलेल्या नित्य कारभारास संचालक म्हणून आपली संमती नसल्याने आपण राजीनामा देत असल्याचे सुधीर फराटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. वेळी १३ मुद्दे उपस्थित करत असताना संचालक पदाचे कर्तव्य निभावण्यापासून रोखणे.कारखान्याची माहीती मिळवून न देणे.संचालक मंडळाच्या सभेत निर्णय न घेता परस्पर निर्णय घेणे.रावसाहेब दादा पवार शैक्षणिक फाउंडेशनला ५ एकर जागा संचालक मंडळाच्या सभेचा ठराव न घेता परस्पर देणे.रावसाहेब दादा पवार फाउंडेशनला जागा देण्यास थेट विरोध आहे.कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीची वास्तव माहीती संचालक मंडळाला न देणे.चेअरमन साहेबांचा मनमानी व हुकुमशाही कारभार,कामगारांचे ६ महिन्यांचे पगार थकविणे.शेअर हस्तांतरण प्रक्रियेत पारदर्शकता नाही.कामगारांची पगारवाढ करताना भेदभाव करण्यात येतो.कारखान्याचे संचालक सुदाम भुजबळ यांचा राजीनामा संचालक मंडळाच्या सभेत न मांडता परस्पर मंजूर करणे.जाणीव पूर्वक कारखाना क्षेत्रातील खाजगी साखर कारखान्यास मदत होईल असे निर्णय  घेणे.संचालक मंडळाच्या सभेत उपस्थित केलेल्या विषयांची कामकाजात नोंद न घेणे.मनमानी कारभारामुळे कामगार दुसऱ्या कारखान्यात जात आहेत.हे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत राजीनामा देत असल्याचे सुधीर फराटे यांनी आपल्या राजीनामा पञात म्हटले आहे.
– सुभाष शेटे,(कार्यकारी संपादक,सा.समाजशील)
 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *