मोनाली माळी, सोनाली माळी या दोघी सख्ख्या बहिणी विज्ञान शाखेत प्रथम तीन क्रमांकात
शिक्रापूर ( प्रतिनिधी:- राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेचा एच एस सी परिक्षेचा एकूण निकाल ९६.०१ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.९३ टक्के लागला असून विज्ञान शाखेतील १८८ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचा निकाल ८५.७१ टक्के लागला असून कला शाखेतील ६३ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती.त्यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेचा निकाल ९६.६९ टक्के लागला असून वाणिज्य शाखेतील १५१ विद्यार्थी परिक्षेस बसले होते.त्यापैकी १४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण ४०२ विद्यार्थी बारावीच्या परिक्षेस बसले होते. त्यापैकी ३८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतील माळी मोनाली जयप्रकाश या विद्यार्थिनीने ४३१ गुण मिळवून ( ७१.८३ टक्के) विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक मिळविला.भोसले श्वेता लक्ष्मण या विद्यार्थिनीने ४३० गुण मिळवून (७१.६७ टक्के) विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला. माळी सोनाली जयप्रकाश ४२९ गुण मिळवून (७१.५०टक्के) विज्ञान शाखेत तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेतील बनकर आदिती किरण या विद्यार्थिनीने ५१३ गुण मिळवून (८५.५०टक्के)कला शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. कुरशिगे वैष्णवी ओंकार या विद्यार्थिनीने ३६५ गुण मिळवून ( ६०.८३ टक्के) कला शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला. सोनवणे काजल मेघराज या विद्यार्थिनीने ३५४ गुण मिळवून (५९ टक्के) कला शाखेत तृतीय क्रमांक मिळविला. खंडागळे मयुरी गणेश या विद्यार्थिनीने ५६२ गुण मिळवून (९३.६७ टक्के) वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक मिळविला. भुजबळ श्रावणी रमेश या विद्यार्थिनीने ५२६ गुण मिळवून ( ८७.६७ टक्के ) वाणिज्य शाखेत द्वितीय क्रमांक मिळविला. जाधव दिपाली गणेश या विद्यार्थिनीने ४९८ गुण मिळवून ( ८३.०० टक्के ) वाणिज्य शाखेत तृतीय क्रमांक मिळविला. विद्यालयातील अध्यापक,अध्यापिका तसेच ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.