कु.संध्या मावळे अकाउंट विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात अव्वल
आशिष कोहकडे कॉम्प्युटर सायन्स तर वरद ठोंबरे इंग्रजी विषयात शिरूर तालुक्यात प्रथम
शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील ज्ञानगंगा विश्व विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स चा बारावीचा निकाल १००% टक्के लागला आहे. यामध्ये सायन्स विभागात एकूण २३५ आणि कॉमर्स विभागातील ९२ असे एकूण ३२७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये सायन्स विभागातून गजेंद्रसिंग चेतराम याने ८६.८३% गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु. संस्कृती सुनील शेळके हिने ८५.६७ % गुण मिळवत विद्यालयात द्वितीय, याचबरोबर कु.आर्या भाऊसाहेब पाचुंदकर हिने ८२.८३ % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर आशिष प्रमोद कोहकडे याने कॉम्प्युटर सायन्स या विषयात २०० पैकी १९१ गुण मिळवत शिरूर तालुक्यात सर्व प्रथम आला आहे. तर वरद शरद ठोंबरे इंग्रजी विषयात ९३ गुण मिळवत संपूर्ण शिरूर तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
तर कॉमर्स विभागातून कु. प्रिया प्रदीप शिगवण ९३ % गुण मिळवत प्रथम क्रमांक, कु.संध्या जालिंदर मावळे ९२% मिळवून द्वितीय क्रमांक, तर कु.समृद्धी दिपक देवकर ९१.८३% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कु.संध्या मावळे हिने अकाउंट विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.राजेराम घावटे यांनी या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आपल्याला मार्गदर्शन करण्याऱ्या शिक्षकांचे आभार मानले. तसेच उपस्थित पालकांनी देखील आपल्या मनोगतात आपले पाल्य या शाळेत शिकल्याचे समाधान व्यक्त करत संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेराम घावटे यांचे आभार मानले.