समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मागील ३५ वर्षांपासून आंबेगावचे व १५ वर्षांपासून शिरूरच्या ४२ गावांचे राज्याच्या विधानसभेत यशस्वी नेतृत्व करीत या संपूर्ण भागाचा सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत कार्यरत असणारे राज्याचे सहकार मंत्री तथा या भागाचे लोकप्रतिनिधी यांना आंबेगाव शिरूरच्या निवडणुकीत वळसे साहेबांना होणाऱ्या मतदानात महिलाच सर्वाधिक बाजी मारणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)च्या युवती नेत्या,कार्यकर्त्या पूर्वा ताई दिलीपराव वळसे पाटील यांनी केले. त्या ना.वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथे आयोजित महिला मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी उमेदवार ना.दिलीपराव वळसे पाटील,माजी लोकप्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर,माजी आमदार पोपटराव गावडे,जयश्री ताई पलांडे,मानसिंग पाचुंदकर पाटील,प्रदीपदादा वळसे पाटील,विवेक वळसे पाटील महायुतीतील घटक पक्षांचे महिला,पुरुष पदाधिकारी, व समोरच्या प्रांगणात न मावलेला,ना.वळसे पाटील यांना समर्थन देण्यासाठी आलेल्या हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिला मेळाव्यास मार्गदर्शन करताना पूर्वा ताई पुढे म्हणाल्या कि,आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण सर्व उपस्थित असून आमच्या सगळ्यांच्याच माय भगिनी तुमच्या सगळ्यांचा आणि मंचावरती उपस्थित महायुतीचे सगळेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचे सहकारी सगळ्यांचेच मी आजच्या सभेमध्ये स्वागत करते. एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी आज आपल्या लाडक्या आदरणीय वळसे पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत आणि ते सुद्धा श्री क्षेत्र रांजणगाव गणपतीच्या परिसरामध्ये त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी एवढी सगळी देवी शक्ती ते उपस्थित आहे याच्याहून चांगलं कोणतच काही कार्य आपण करू शकलो नसतो. कारण त्या देवीचा अंश तुमच्या सगळ्यांमध्ये आहे ज्या पद्धतीने तुम्ही एकदम मनापासून जिवापासून आदरणीय साहेबांवर गेली ३५ वर्ष प्रेम करत आले आहात आता आम्हाला कळतच नाही आंबेगाव ची लोक कोणती ? आणि शिरूरची कोणती ? सगळी एकच झाली आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून इकडच्या जनतेने ना.वळसे साहेबांवर जीवाच्या वर प्रेम केलंय.
साहेबांचा जेव्हा त्यांचा एक्सीडेंट झाला होता तेव्हा त्यांनी लवकर बरं व्हावं म्हणून कोणी दर्ग्यावरती चादर चढवत होते.कोणी कामक्षा मातेला जाऊन साहेबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते.आणि ही जी मनापासून लोकांची साहेबांवर असलेली भावना,प्रेम आम्ही बघतो तेव्हा आपल्याच कुटुंबातील हे लोक साहेबाना आधार देताना दिसून येतात. जेव्हा साहेबांवरती चांगले वाईट प्रसंग येतात आणि ज्या पद्धतीने आमच्या महिला भगिनी त्यांच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा असं वाटतं की हे कमावलंय आपल्या साहेबांनी गेल्या ३५ वर्षांमध्ये. हीच आहे साहेबांच्या आयुष्याची खरी संपत्ती तुमच्या सगळ्यांचे प्रेम तुमच्या सगळ्यांचा विश्वास तुमच्या सगळ्यांची साथ आणि साहेबांनी सुद्धा तुमचा हा विश्वास जपलेला आहे.आपल्या महिला भगिनींच्या पाठीशी साहेब सदैव भक्कमपणे उभे राहिले आहेत. आज आपल्या मतदारसंघांमध्ये जर आपण बघितलं तर महिला सक्षमीकरणासाठी आदरणीय साहेबांनी आणि आदरणीय किरण ताईनी सुद्धा अथक परिश्रम घेतलेले आहेत. त्यांच्या आईच्या नावाने त्यांचे एक संस्था सुरू केली अनुसया महिला उन्नती केंद्र ज्याच्यामार्फत ६ हजार महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना त्यांनी मिळवून देण्याचे काम केले आहे या महिलांच्या आयुष्यात ही आर्थिक स्थिरता किंवा हा एक हा एक मदतीचा हात म्हणून त्यांचं जे योगदान राहिलं आहे ते आपली जनता कधीच विसरणार नाही आज इथे इतक्या मोठ्या संख्येमध्ये लाडक्या बहिणी सुद्धा उपस्थित आहेत आणि एवढंच नाही तर तरुणाई सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित आहेत मुलींच्या शिक्षणासाठी एनसीआरडीच्या मार्फत सहा शाळा आहेत. आपल्या तालुक्यामध्ये अनेक गोर गरीब मुला मुलींना मोफत शिक्षण उपलब्ध करून देतानाच आपल्या अवसरीमध्ये गव्हर्मेंट इंजीनियरिंग पॉलिटेक्निक सुद्धा सूर करण्याचे कार्य ना.वळसे साहेबांनी केले आहे. सीबीएससी माध्यमाची सगळ्यात पहिली शाळा इंग्रजी मीडियमची आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात पहिले जर कोणी आणली तर ती आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणली आणि तेवढ्याच नाही तर शिरूर परिसरामधली जी हे ४२ गाव आहेत. तिथे सुद्धा जे काही मूलभूत पायाभूत सुविधांचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आदरणीय साहेबांनी मार्गी लावलेले आहेत.
आपल्या तालुक्यामध्ये जे सहकाराचे जाळं साहेबांनी निर्माण केला आहे ते खरंच अभूतपूर्व आहे. आपल्या देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये कितीतरी सहकारी साखर कारखाने कार्यरत असून आपल्याच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा दरवर्षी पहिला नंबर कसा येतो बरं ? आपल्या साहेबांचे मोठे कौशल्य,योगदान आहे की नाही हे सराव सामान्य जनतेला नक्कीच ज्ञात असावे. कधी कुठे संकटाला संकट मोचक म्हणून आपले वळसे साहेब तिकडे धावून जातात मग ते माळीन सारखी अत्यंत वेदना देण्यासारखी दुर्घटना असेल किंवा आज जो आपल्या पाण्याचा लढा सुरु आहे. आपले साहेब तो लढा जोमाने लढताहेत. आपले हक्काचे पाणी आपल्या भागालाच राहिले पाहिजे यासाठी ते जोमाने लढा देत आहेत. येणाऱ्या प्रत्येक संकटाला साहेबांनी यशस्वी पणे तोंड दिले आहे. अनेकांच्या मदतीच्या हाकेला साहेब धावून गेले आहेत आणि संकट मोचक म्हणून प्रत्येक प्रसंगात साहेब उभे राहिले आहेत. त्यांनी प्रत्येक प्रसंगात मार्ग काढला आहे एक सरल दिशा दाखवली आहे. महिला भगिनींनो आता सुद्धा आपल्याला एक दिशा दाखवायची आहे ती त्यांना भरघोस मताधिक्य देऊनच.
आज आपल्या वरती जेव्हा एवढे मोठे एक पाण्याचे संकट आलेले आहे त्याचा लढा आपले आदरणीय साहेब ताकतीने लढताहेत एक जण सुद्धा विरोधातला त्यांच्याविषयी कधी काही चुकीचं बोलू शकले नाहीत उभ्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत कधी भ्रष्टाचाराची एक केस सोडा, एक आरोप सुद्धा नाही. एकेकाळी जो आपला दुष्काळी आणि मागास तालुका म्हणून आपली ओळख होती त्याला पुसून काढून आज त्याला नंदनवन केलं. जिराईत जमीन बागायत केली. सहकाराची एवढी मोठी गंगा इकडे वाहली. शिक्षण क्षेत्रात साहेबांनी खूप मोठे काम केले. आरोग्यासाठी, महिलांसाठी वेगळे हॉस्पिटल बांधले. आदिवासींच्या मुलांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि आश्रम शाळा बांधल्या आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला प्रत्येक प्रत्येक जणाला सोबत घेऊन साहेबांनी काम केलंय. कधी पक्षवाद केला नाही, कधी जातीवाद केला नाही, कधी धर्मवाद केला नाही. कधी कोणी काही काम घेऊन आलं तर साहेबांनी कधी बघितलं नाही हा आपल्या विचाराचा आहे की नाही ? यांनी आपल्याला मत दिलं की नाही ? यांचा वॉर्ड आपल्याला प्लस होता की नाही तरच त्याच्या वार्डात काम होईल तरच याला निधी होईल निधी भेटेल. तुम्ही सगळेजण साहेबांचा प्रचार करत आहात आणि कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडत नाहीत कारण तुम्ही साहेबांना इतक्या चांगल्या पद्धतीने ओळखतात की तुमचा जो साहेबांच्या पाठीशी सदैव पाठिंबा राहिला आहे. आंबेगाव शिरूरच्या अंग आमी निवडणुकीत आमच्या महिला भगिनी यावेळेस बाजी मारणार आहेत. शिरूर,आंबेगावातून सगळ्यात जास्त लीड आमच्या महिला आपल्या वळसे साहेबांना देणार आहेत. कारण आपल्या साहेबांनी मतदार संघातील गावोगावी,वाड्यावस्त्यांवर नळ पाणीपुरवठा योजना राबविल्याने महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे आणि आज हाच डिंभे धरणातील पाण्याचा लढा आपले साहेब इकडे लढत आहेत मला तुमच्या सगळ्यांमध्ये विश्वास आहे तुम्ही आमच्या कुटुंबावर आमच्या सगळ्यांवर आणि साहेबांवर इतके वर्ष एवढं प्रेम केलं त्यांना आशीर्वाद दिले त्याबद्दल मी कायमच आयुष्यभर तुमची सगळ्यांची ऋणी राहील. याही वेळेस ना.वळसे साहेबांच्या पाठीशी भक्कम उभे राहून त्यांना भरगोस मतदान करा व पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा हि विनंती.
|