शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील बाबुरानगर येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स येथे विज्ञान विभाग प्रमुख भौतिक शास्राचे प्राध्यापक चंद्रकांत शिंदे यांची उपप्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे, उपाध्यक्ष दीपक घावटे, संचालक सुधीर शिंदे, संचालिका अमृता घावटे, सी.ई.ओ. डॉ.नितीन घावटे यांच्या हस्ते व प्राचार्य संतोष येवले, शिक्षक यांच्या उपस्थितीत शिंदे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कॉलेज समन्वयक व्ही.डी शिंदे यांनी भाषणातून चंद्रकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. तर शिंदे यांनी आपण दिलेल्या पदाच स्वीकार करत, संस्थेच्या उन्नतीसाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असुन, विद्यार्थ्यांच्या शैक्षिणक, सामाजिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासावर भर देणार असल्याचे सांगत संस्थेचे आभार मानले.




