समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – आज दि. २३ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण कवठे येमाई ता.शिरूर येथे पालक,शिक्षक,ग्रामस्थ समन्वय व विविध समस्या उपाय योजना संदर्भात झालेल्या सहविचार बैठकीत शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांसाठी अनेक ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याने आजच सुमारे ७० हजार रुपये मदत मिळाल्याचे मुख्याध्यापिका रंजना गावडे,खोमणे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत भोर हे होते.
तर या बैठकीसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे दोन उपाध्यक्ष,संचालक,ग्रामस्थ,पा लक, शाळेचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी शालेय गुणवत्ता,भौतिक सुविधा,मूल्यमापन व पोषण आहार याविषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्रास्ताविकात वरिष्ठ उपशिक्षक सखाराम फंड यांनी मांडलेल्या विविध शासकीय लाभांच्या योजना,पाल्यांच्या गुणवत्ते संदर्भात चर्चा,शालेय फर्निचर नियोजन,कवठे गाव बिबट प्रवणक्षेत्र असल्याने शाळांच्या वेळेत झालेला बदल विद्यार्थ्यांची सुरक्षा इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष अर्चना देवकर,डॉ.आरती उचाळे,शिक्षण तज्ञ संचालक वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव नाना उघडे,गुरुवर्य विलासराव सालकर,शाळेतील शिक्षक गावडे मॅडम,राजेंद्र रेणके,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वागदरे,आनंदराव पवार,गणेश गावडे,अप्पा वागदरे व अनेक पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या भौतिक सुविधांसाठी स्वेच्छेने मदत करा : प्रा.सुभाष अण्णा शेटे,तज्ञ शिक्षण संचालक,शाळा व्यवस्थापन समिती
” ज्या शाळेत शिकून आपण लहानाचे मोठे झालो त्याच शाळेत आपली मुले,नातवंडे शिक्षणाचे बाळकडू घेत आहेत. कवठे येमाई गावठाणातील आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक आदर्शवत शाळा असून सुमारे २७० विद्यार्थी एक ते सातवी पर्यंतचे शिक्षण घेत आहेत.आपल्या शाळेप्रती कृतज्ञता म्हणून आपण दिलेल्या आर्थिक,वस्तुरूपी योगदानातून शाळेच्या भौतिक सुविधांत मोठीच मदत होणार असल्याने शाळेचे माजी विद्यार्थी,मान्यवर ग्रामस्थ,पालक,दानशूर,उद्योजक यांनी माझी शाळा,आपली शाळा समजून अधिकाधिक व सर्वोतोपरी मदतीचा हात द्यावा.”



