मंचर येथील आजच्या विराट सभेनंतर ना.वळसे साहेबांच्या विजयावर होणार शिक्कामोर्तब – युवा नेते राजेंद्र सांडभोर यांचा ठाम विश्वास 

327
 शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) –  शिरूर, आंबेगाव चे विकास पुरुष समजले जाणारे राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे आज होणाऱ्या विराट सभेनंतर या भागाचे लोकप्रिय आमदार ना.दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचा ठाम विश्वास शिरूर तालुक्यातील कवठे – टाकळी हाजी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष् युवानेते राजेंद्र सांडभोर यांनी व्यक्त केला आहे. तर २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत गटातुन अधिकाधिक मतदान कसे होईल यासाठी वळसे पाटील निष्ठावंत कार्यकर्ते जोरदार पणे कार्यरत असून सर्वांना सोबत घेत साहेबांना अधिकाधिक मतदान कसे होईल याचा कसून प्रयत्न करण्यात येत असून विधानसभा मतदार संघातील जागृत मतदार या वेळी देखील संधी साधूंना आगामी निवणुकीत होणाऱ्या मतदानातून नक्कीच त्यांची जागा दाखवतील असा ठाम विश्वास सांडभोर यांनी व्यक्त केला आहे.
मंचर येथे ना.वळसे पाटील यांची आज होणारी प्रचाराची सांगता सभा म्हणजे त्यांच्या मोठ्या विजयाची नांदी ठरणार असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या कवठे – टाकळी गटासह शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघातील अधिकाधिक नागिरीकांनी,महिला भगिनींनी मंचर येथे ना.वळसे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करतानाच कुठल्याही भूलथापांना बळी न पडता दुसऱ्या क्रमांकाच्या नावा समोरील ना.वळसे पाटील यांच्या घडयाळाच्या चिन्हाचे बटन दाबावे व त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून पुन्हा एकदा आपला बुलंद आवाज ना.वळसे पाटील साहेबांना विधानसभेत पाठवा अशी कळकळीची विनंती राजेंद्र सांडभोर यांनी केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds