ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा स्पर्धा संपन्न

489
शिरूर, पुणे (समाजशील वृत्तसेवा) : ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल शिरूर येथे गेली तीन दिवस मेजर ध्यानचंद क्रीडा स्पर्धा 2024-25 हा क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला. या महोत्सवाचा उदघाटन समारंभ गंगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.राजेराम घावटे यांच्या हस्ते व उपाध्यक्ष दीपक घावटे, सचिव सविता घावटे,  संचालक सुधीर शिंदे, संचालक प्रसाद घावटे,  संचालिका अमृता घावटे, सीईओ डॉ. नितीन घावटे यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व क्रीडा ज्योत पूजनाने झाला.
दोन दिवस सर्व विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व तिसऱ्या दिवशी सर्व पालकांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. कबड्डी, खो खो, लंगडी, रस्सीखेच, धावणे, लांब उडी, दोरी उडी, चमचा लिंबू, यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचा अनुभव मिळावा या उद्देशाने या क्रीडा स्पर्धांचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य गौरव खुटाळ, उपप्राचार्या शोभा अनाप, क्रीडा शिक्षक संदीप पवार सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने या स्पर्धा आनंददायी व उत्साही वातावरणात संपन्न झाल्या. शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष शरद दुर्गे व आदर्श क्रीडा शिक्षक ज्यांनी असंख्य राज्य, देश पातळीवर खेळाडू घडविले ते संदीप घावटे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds