समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक ) – राज्यातील एक लक्षवेधी ठरलेली व हाय व्होल्टेज म्हणून समजली जाणारी आंबेगाव शिरूर विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उमेदवार नामदार दिलीपराव वळसे पाटील व शरदचंद्रजी पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यात अतिशय अटीतटीची लढत झाली. एकीकडे गेली ३५ वर्षे आंबेगाव चे प्रतिनिधित्व व राज्याच्या मंत्रिमंडळात विविध पदे यशस्वी पणे सांभाळणारे राज्याचे सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील व शरद पवार यांचा वरदहस्त लाभलेले शरद पवार यांच्या गटाचे देवदत्त निकम यांची लढत मतदानाच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा वाढवणारी ठरली. यात नामदार दिलीप वळसे पाटील एक हजार पाचशे चाळीस मत अधिक मिळवत विजयश्री खेचून आणली. शिरूर आंबेगावच्या मतदारांबरोबरच संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. शेवटी मतदारांनी वळसे पाटील यांनी या भागात केलेली कोट्यावधी रुपयांची विकास कामे व शेतकरी,महिला, यांच्याबाबत त्यांच्याकडे असलेली दूरदृष्टी, व शेवटच्या टप्प्यात त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सातत्याने लावून धरलेला पाण्याचा प्रश्न त्यामागची साहेबांची दूरदृष्टी मतदारांच्या लक्षात आल्यानंतर साधारण ८ ते १० दिवसापूर्वी देवदत्त निकम यांच्या बाजूने निर्माण झालेला कल,सहानुभूती फिरविण्यात साहेबांच्या समर्थकांना यश आल्याचे आजच्या लढतीतील साहेबांच्या विजयातून दिसून आले. विशेष करून साहेबांची कन्या पूर्व वळसे पाटील यांनी पिंजून काढलेला पूर्ण मतदार संघ,मतदारांना केलेले आवाहन, परागचे अध्यक्ष यशवर्धन डहाके यांनी कवठे टाकळी हाजी, रांजणगाव गटात गावोगावी जात दिवस रात्र मतदारांशी साधलेला संपर्क, संदीप हिंगे,दीपक रत्नपारखी,राजेंद्र गावडे,सोनभाऊ मुसळे,विलासराव रोहिले,मिठूलाल बाफना,रामदास बंडू कांदळकर,बाळासाहेब डांगे,अमोल ढोरके,डॉ.सुभाष पोकळे,किसन हिलाळ, गणेश जामदार,सुरेश गायकवाड,बिरा शिंदे,विलास थोरात,माधुरी थोरात,नीता कोळेकर,शुभांगी पडवळ या व असंख्य वळसे पाटील समर्थकांनी हक्काचे मतदार साहेबांच्या पाठीशी कसे राहतील याबाबत घेतलेली मेहनत कामी आली असून या रोमहर्षक लढतीचे वळसे पाटील साहेब यांच्या विजयात आज परवर्तित झालेचे दिसून आले.
Home बातम्या पुणे आंबेगाव मधून झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत अखेर नामदार दिलीप वळसे पाटलांची विजय परंपरा कायम – शिरूर,आंबेगाव मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत एकच जल्लोष
आंबेगाव मधून झालेल्या हाय व्होल्टेज लढतीत अखेर नामदार दिलीप वळसे पाटलांची विजय परंपरा कायम – शिरूर,आंबेगाव मध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत एकच जल्लोष
BySamajsheelNovember 23, 20240
351
Previous Postबालदिनी कवठे अंगणवाडीतील बालकांना आरोग्यदाई शतावरी कल्प भेट - डॉ.चेलना सावळे,जैन यांचा विधायक उपक्रम
Next Postज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कुल मध्ये मेजर ध्यानचंद क्रीडा स्पर्धा संपन्न