शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर संपन्न

455

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर ग्रामपंचायत यांच्या वतीने मकर संक्रांत निमित्ताने भव्य हळदीकुंकू समारंभ व आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्या कार्यक्रमास शिक्रापूर पंचक्रोशीतील सर्व महिलांनी उदंड असा प्रतिसाद दिला. तब्बल तीन ते पाच हजार महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. शिक्रापूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमीच महिलांसाठी मानसन्मान व विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आग्रही राहत असल्याने यंदा खूप मोठ्या प्रमाणात महिलांच्या मनोरंजनासाठी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात शिक्रापूर मधील सर्व क्षेत्रातील महिलांनी सहभाग दर्शवला. हा कार्यक्रम त्रिमूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी घेण्यात आला. शिक्रापूर मधील सर्व अंगणवाडी सेविका, सर्व आरोग्य विभागाच्या आशा वर्कर, शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस महिला अधिकारी, सर्व बालवाडी सेविका, सर्व महिला शिक्षिका, सर्व ग्राम संघातील महिला अधिकारी सर्व बचत गटातील महिला यांनी अगदी हिरारीने सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच सर्वांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी शिक्रापूर नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे, उपसरपंच पूजा ताई भुजबळ, माजी उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच सारिकाताई, सासवडे मोहिनी, संतोष मांढरे, सीमाताई लांडे, ग्रामपंचायत सदस्या मोहिनीताई, मांढरे वंदनाताई, भुजबळ उषाताई, राऊत शालिनीताई, राऊत कविता टेमगिरे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे मा. जिल्हा परिषद सदस्या रेखाताई बांदल कुसुमताई मांढरे यांनीही कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व होम मिनिस्टर कार्यक्रम कुमारी ईश्वरी खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यवस्थित पार पाडला. तसेच महिलांच्या आरोग्य विषयी डॉ. तृप्ती भुजबळ डॉ.जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. महिलांच्या रोजगारा विषयी रुपाली काळभोर मॅडम यांनी मार्गदर्शन केले. तसेच पहिल्या पाच महिलांना बक्षीस व पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले व ग्रामपंचायत सदस्या, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बालवाडी सेविका यांचाही एक खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक अर्चना कृष्णा सासवडे यांनी पटकावला व त्यांना सरपंच रमेश गडदे यांच्या वतीने पैठणी साडी देण्यात आली तसेच सर्व उपस्थितांसाठी अल्पहाराचे आयोजन करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds