NEWS
Search

जांबुत – वडनेर रस्त्यावर दोन महिन्यापासून ढिगारा : अपघातास ठरतोय कारणीभूत :  जीव गेल्यावर च प्रशासन जागे होणार का ? विनायक चौधरी यांचा सवाल 

226
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे  (देवकीनंदन शेटे,संपादक) : शिरूररच्या बेट भागातून जाणाऱ्या जांबुत – वडनेर रस्त्यावर मागील दोन महिन्यापासून एक मोठा ढिगारा रस्त्याच्या अर्धवट भागा पर्यंत पडून असून अनेकदा या ठिकाणी घडत असून हा ढिगारा अपघातास कारणीभूत ठरत आहे.एखाद्याचा जीव गेल्यावर च प्रशासन जागे होणार का ? असा संतप्त सवाल वडनेर खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक चौधरी यांनी केला आहे.
याच ढिगाऱ्याजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात विनायक चौधरी यांच्या मातोश्री शांताबाई रखमा चौधरी या डोक्याला मार बसल्याने गंभीर जखमी झाल्या तर त्यांच्या पत्नी अर्चना विनायक चौधरी यादेखील जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली असून ध्रुव बाबाजी सुरकुंडे आणि इतर अनेक दुचाकीस्वार याच ठिकाणी घसरून पडल्याने जखमी झाले आहेत दररोज दोन तीन जण त्या ठिकाणी पडत आहेत अनेक अपघात झाले असून या ठिकाणी एखादा जीव गेल्यावर च प्रशासन जागे होणार का असा प्रश्न चौधरी यांनी उपस्थित केला आहे.  या रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे.दररोज एक दोन लोक पडतात येथे काल पण दोन अपघात झाले एखादा जीव जाऊ शकतो. हा ढिगारा खूप धोकादायक ठरत आहे.
संबंधित विभागाने रस्त्यालगत पडलेला ढिगारा लवकरात लवकर हलवावा  योग्य योग्य तेथे दिशादर्शक फलक लावावेत आणि काम वेगाने पूर्ण करावे
अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन करण्याचा इशारा कार्यकारणी सदस्य भाजपा पुणे जिल्हा पदवीधर आघाडी विनायक रखमाजी चौधरी यांनी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *