समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा व शिरूरच्या बेट भागातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्वपूर्ण असलेल्या शिक्रापूर ते मलठण या मार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असून होणा-या रस्ता नूतनीकरणाच्या कामामुळे या रस्त्याची अनेक ठिकाणी वाताहात झाली असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. सदर रस्त्याच्या कामासाठी मातीचा वापर केला जात असल्याने निर्माण होणाऱ्या फुफाटा व धुळीमुळे दैनंदिन जीवनावर देखील मोठा परिणाम होत असल्याची खंत वाघाळे गावाचे सामाजिक कार्यकर्ते,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोकराव सोनावणे पाटील व परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.सदर रस्त्याच्या कामासाठी मुरुमाचा वापर करून त्यावरती दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाणी मारण्याची व्यवस्था करणे अपेक्षित असताना ते दिले जात नाहीत. रस्त्याचे काम सुरु असल्याबाबत च्या सूचना संबंधित ठेकेदार यांनी तसे फलक लावून दिल्या पाहिजेत. तसेच दुसरा पर्यायी रस्ता स्थानिक नागरिकांना नसल्याने काम चालू असलेल्या रस्त्यावरुनच विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज तसेच नागरीकांना दुग्ध,शेतमालाची वाहतूक करावी लागत आहे. या परीसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ठेकेदार यांना वेळोवेळी या अडचणींची कल्पना देऊनही ठेकेदार अडमुठे पणाचे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप सोनावणे पाटील व नागरिकांमधून केला जात आहे. तर रस्त्याच्या महत्वपूर्ण प्रश्नी संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार जागे होणार का ? असा प्रश्न नागरिकांच्या मधुन उपस्थित केला जात आहे.वरील बांबीची ठेकेदार आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेणे अपेक्षित आहे. शिक्रापूर ते मलठण ते जांबुत या रस्त्यावरील कामाच्या संदर्भात संबंधित ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकारचा बोर्ड काम कशातून आहे ? आणि कसा रस्ता आहे ? याची कोणतीही माहिती लावलेली नाही. ती माहिती कोणी देईल काय? असा संतप्त सवाल हि अशोकराव सोनावणे व परिसरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
Home बातम्या पुणे शिक्रापूर ते मलठण रस्त्याची अनेक ठिकाणी वाताहत : होणा-या रस्ता नुतनीकरणाचे काम अत्यंत संथगतीने : उडणारा फुपाटा, खड्ड्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण

शिक्रापूर ते मलठण रस्त्याची अनेक ठिकाणी वाताहत : होणा-या रस्ता नुतनीकरणाचे काम अत्यंत संथगतीने : उडणारा फुपाटा, खड्ड्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण
BySamajsheel NewsMarch 17, 20260
Previous Postधनकवडीतील धोकादायक चेंबरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताची वाट पाहताय का? सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई नाईक यांचा संतप्त सवाल
Next Postजांबुत - वडनेर रस्त्यावर दोन महिन्यापासून ढिगारा : अपघातास ठरतोय कारणीभूत : जीव गेल्यावर च प्रशासन जागे होणार का ? विनायक चौधरी यांचा सवाल
