NEWS
Search

धनकवडीतील धोकादायक चेंबरकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; अपघाताची वाट पाहताय का? सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई नाईक यांचा संतप्त सवाल

49
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  मागील वर्षभरात सातत्याने सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत ते मार्गी कसे लागेल असा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय युवती उपाध्यक्षा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वर्षाताई नाईक यांनी पुण्याच्या धनकवडी परिसरातील पुण्याई नगर २०/१ रुबी बेकरी समोर जवळ रस्त्याच्या कडेलाच असलेला मोठा व धोकादायक चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती अभावी उघड्यावर पडलेला असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
या संदर्भात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “हा जीवघेणा प्रकार दिसत असूनही संबंधित यंत्रणा का गप्प बसली आहे ? एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का?” विशेष म्हणजे, हा चेंबर रस्त्याच्या कडेला असल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात तो नजरेस न पडण्याची शक्यता अधिक असून पादचारी, दुचाकीस्वार व लहान मुलांसाठी तो अत्यंत धोकादायक ठरत आहे. परिसरातील नागरिकांनीही तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.दरम्यान, प्रशासनाने तत्काळ याकडे लक्ष देऊन चेंबरची सुरक्षित दुरुस्ती करावी, अन्यथा याबाबत परिसरातील नागरिकांसह आवाज उठवण्याचा इशारा वर्षाताई नाईक यांनी दिला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *