समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ( देवकीनंदन शेटे,संपादक) : तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडी परिसरात शेतजमिनीच्या वहिवाटीचा अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न अखेर शांततेत मार्गी लागला. शिरूर महसूल विभागाच्या तत्पर हस्तक्षेपामुळे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी या प्रश्नी दिलेल्या निकालानंतर आज बुधवार दि. १८ ला हा १० फूट रुंदीचा रस्ता खुला करण्यात आला. खुला झालेल्या रस्त्यामुळे आजुबाजुकडील शेतकऱ्यांना आपापल्या शेतात वहिवाटीसाठी जाण्यास मोठाच दिलासा मिळणार आहे.
या प्रक्रियेत मंडल अधिकारी विजय फलके,ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव,सविंदण्याचे तलाठी पवार तसेच सहाय्यक फौजदार शरद गावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर स्थानिक शेतकरी कोंडीभाऊ इचके, बबन इचके, सदाशिव क्षीरसागर, दादू बोऱ्हाडे, सहायक लव्हाजी सांडभोर यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
विशेष म्हणजे हा प्रश्न कोणताही वाद न निर्माण होता पूर्णपणे सामोपचाराने सोडविण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांनी परस्पर समंजसपणा दाखवत उर्वरित रस्त्याचाही प्रश्न आपापसात सोडवून घेतला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना आता शेतात ये-जा करणे सुलभ होणार आहे.या कामी युवा क्रांती राष्ट्रीय किसान विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे यांनी ही महत्वपूर्ण भूमिका बजावली. तहसीलदार शिरूर यांच्या बांधावरील १० फुटी रस्ता खुला करण्याच्या आदेश व्यतिरिक्त त्यापुढील शेतकरीही येथे जमा झाले होते.त्या सर्वांना एकत्रित बसवून विचार विनिमय व सामंजस्यातून पुढील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न ही याच वेळी सर्वांशी चर्चा करून सोडविण्यात आला. उपस्थित पुढील शेवटच्या टोकापर्यंत च्या शेतकऱ्यांनी प्रा.शेटे यांच्या विनंतीस मन देऊन पुढील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला. या निर्णयामुळे परिसरातील तणाव टळून शांततेत मार्ग निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महसूल विभागाच्या तात्काळ कारवाईचे ही नागरिकांकडून स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.याच प्रकारे ज्या शेतकऱ्यांचे शेतात जाण्याच्या वाटांचे,बांधावरील रस्त्यांचे प्रश्न सामंजस्याने सोडविल्यास प्रशासनाचा भर हलका होईल व इतरांसाठी एक उत्तम आदर्श निर्माण होईल असा विश्वास राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे यांनी व्यक्त केला आहे.