गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीर हनुमान मंदिरास स्पिकर सेट प्रदान : कवठे येमाई तील तरुणांचा उपक्रम 

707

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावठाणातील श्री हनुमान भक्त तरुणांनी आज चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर येथील ऐतिहासिक जागृत देवस्थान तरणमंत्र श्री वीर हनुमान मंदिरास सुमारे ६० हजार रुपये किमतीचा स्पिकर सेट प्रदान केला आहे. गुढीपाडव्याच्या पवित्र  दिवशी या स्पिकर सेटचे लोकार्पण गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.


या उपक्रमामुळे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन तसेच विविध सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे पार पाडता येणार आहेत. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत तरुण मंडळाच्या या विधायक कार्याचे कौतुक केले आहे.कार्यक्रमास गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ,तरुण हनुमान भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *