NEWS
Search

जिल्हा गुणवत्ता यादीत सविंदणे शाळेची दमदार कामगिरी

157

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी) मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सविंदणेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेत साईराज सुभाष पडवळ, सुयश बाळासाहेब इचके आणि कृष्णा राहुल मिंडे यांनी प्रत्येकी २६२ गुण, तर शिवन्या राहुल नरवडे हिने २५२ गुण मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे. मुख्याध्यापक लहू मनाजी शितोळे, वर्गशिक्षक अशोक गोरख फसले आणि सहशिक्षक गणेश बाळू पवार यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक होत आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रितम कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे, केंद्रप्रमुख बाळासाहेब आसवले तसेच शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *