समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कवठे येमाईच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नुकताच २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.शिरूर तालुक्याचे माजी आमदार अशोक बापू पवार यांच्या हस्ते हा धनादेश शाळेला प्रदान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा डॉ. आरती उचाळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत धनादेश स्वीकारण्यात आला.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे तसेच शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे, हा या आर्थिक मदती मागील उद्देश आहे.
यावेळी शिरूर पंचायत समिती सदस्या कांचनताई सांडभोर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. सुभाष पोकळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शांतराम पोकळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबुशा पाटील कांदळकर, पीडीसीसी बँक व्यवस्थापक राजेंद्र चाटे, मलठणचे माजी सरपंच नानासाहेब फुलसुंदर, कवठे विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रितेश शहा, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या आर्थिक मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी कवठे येमाई जिल्हा परिषद शाळेला २५ हजारांची मदत
BySamajsheel NewsAugust 12, 20260
Previous Post१२ ऑगस्ट : युवा शक्ती, हत्ती संवर्धन आणि खगोलीय अद्भुततेचा विशेष दिवस
Next Postहॉटेल संग्रामसमोरील अनधिकृत ‘यू टर्न’ ठरला जीवघेणा; दोघांचा जागीच मृत्यू
