हिवरे गावात संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

46

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  शिरूर तालुक्यातील हिवरे गावात सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत सावता महाराज युवा प्रतिष्ठानच्या वतीने संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा मंगळवारी (दि. ११ ऑगस्ट) भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.संत शिरोमणी सावता महाराज हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी संत सावता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी ह.भ.प. माऊली महाराज पिंगळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले.कीर्तनसेवा विकास गायकवाड गुरुजी यांनी दिली.


यावेळी विकासनाना गायकवाड, उद्योजक देवदत्त गायकवाड आणि चार्टर्ड अकाउंटंट अक्षय गायकवाड यांच्या वतीने भाविकांसाठी अन्नदान व महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. भक्तिमय वातावरणात मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सरपंच राजाराम गायकवाड यांनी केले, तर विजय गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, विविध क्षेत्रांतील पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी याप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून, लोकवर्गणीतून मंदिर व परिसरातील विविध विकासकामे करण्याचा मानस असल्याची माहिती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रेवणनाथ गायकवाड यांनी दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *