समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – महाराष्ट्र राज्य सावता शेतकरी सेना संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या महत्त्वपूर्ण पदावर शिरूर तालुक्यातील विशाल हरिभाऊ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावता शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मुंजाजी गीरे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा केली. शेतकरी बांधवांच्या हितासाठी तसेच त्यांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी सावता शेतकरी सेनेच्या ध्येय-धोरणानुसार कार्य करण्याची जबाबदारी विशाल गायकवाड यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मूळ शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गांजेवाडी,माळीमळा येथील रहिवासी असलेले विशाल भाऊ गायकवाड यांनी शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच सावता शेतकरी सेनेचे जाळे राज्यभर विस्तारण्याचे आवाहनही नियुक्तीपत्रातून करण्यात आले आहे.
या नियुक्तीबद्दल विशाल गायकवाड यांचे माळीमळा,कवठे येमाई ग्रामस्थ,हितचिंतक,मित्र परिवार यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व शेतकरी हिताच्या कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
“जय सावता! जय जवान! जय किसान! जय संविधान!” या घोषवाक्यासह शेतकरी हितासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार विशाल गायकवाड यांनी समाजशील न्यूज शी बोलताना व्यक्त केला आहे.

विशाल हरिभाऊ गायकवाड यांची सावता शेतकरी सेनेच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
BySamajsheel NewsAugust 14, 20260
Previous Postनाशिक फाटा-राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदेला १५ दिवसांत गती
Next Postहिवरे गावात संत सावता महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात
