NEWS
Search

 पोलीस मित्र संघ महाराष्ट्र राज्यात संघटन विस्ताराची मोहीम! सदस्य व पदाधिकारी विस्तार सुरू;आकर्षक किटसह जनसेवेची संधी

29

 समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – समाजहित, जनसेवा, कायदेशीर मदत आणि पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने पोलीस मित्र संघ महाराष्ट्र यांच्या वतीने सदस्य व पदाधिकारी नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. इच्छुक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनसेवेची आवड असलेल्या व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष शाम घाडगे,उपाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे,राष्ट्रीय महिला अध्यक्षा श्रीमती वर्षाताई नाईक यांनी केले आहे.संघाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सदस्य व पदाधिकाऱ्यांसाठी विविध नोंदणी पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये ओळखपत्र, पी.व्ही.सी. कव्हर किचन, वाहन स्टिकर, प्रिंटेड लेटर व माहितीपत्रक यांसारख्या साहित्याचा समावेश आहे. उच्चस्तरीय किटमध्ये बॅज, पेन, जॅकेट आदी साहित्याचाही समावेश आहे.देणगी देणा-या सदस्य,पदाधिकाऱ्यांना संघास देणगी दिल्यास कर सवलत प्राप्त होईल.अधिकची देणगी देणाऱ्या व्यक्तीस कर सवलत प्रमाणपत्र उपलब्ध होईल


देणगी शुल्क व किटचे पर्याय
सदस्य : ₹६९९ – सदस्य (एक्सक्लुझिव्ह किट) : ₹१,४९९ –  पदाधिकारी : ₹१,१९९ –  पदाधिकारी (एक्सक्लुझिव्ह किट) : ₹१,९९९
नोंदणीसाठी आधारकार्डची प्रत, पासपोर्ट आकाराचे एक किंवा दोन फोटो, रक्तगटाची माहिती, संपूर्ण पत्ता व पिनकोड आवश्यक असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. देणगी शुल्क भरल्यानंतर देणगी पावती किंवा स्क्रीनशॉट पाठविण्याची सूचनाही देण्यात आली आहे.पोलीस मित्र संघाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, जनजागृती,महिला सक्षमीकरण,बेरोजगारांना रोजगार मिळण्याकामी मदत,वंचित,पीडित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार ,नागरिकांना कायदेशीर मदतीबाबत मार्गदर्शन आणि समाजात सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्य करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९२८४३८१६९०, ८५३०१६५९४९,९९७५६७४२८६,
आपले घोषवाक्य : “पोलीस मित्र – जनतेचे अस्त्र , सुरक्षित समाजाची आपली जबाबदारी !”
टीप : नोंदणी करण्यापूर्वी पोलीस मित्र संघाची अधिकृत नोंदणी, पदांची वैधता, देणगीची पावती आणि मिळणाऱ्या साहित्याची खात्री करून घ्यावी.संघातील पद किंवा ओळखपत्रामुळे कोणतेही शासकीय अथवा पोलीस अधिकार आपोआप प्राप्त होत नाहीत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *