शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार व महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशाच्या गजरात व गगनभेदी घोषणा देत आपला उमेदवारी अर्ज माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत भरला आहे. आज सकाळी वाघोली येथे वाघेश्वराचे दर्शन घेऊन महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचें उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर बाजार समिती आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य रॅली काढली होती. या रॅलीला मोठा उत्साह मतदार व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दाखवला. शिरूर बाजार समिती आवारातून निघालेली रॅली शिरूर पाच कंदील चौक येथे जाहीर सभेमध्ये परिवर्तित झाली. याच वेळी मोजक्या कार्यकर्त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे आपला उमेदवार अर्ज दाखल केला. यावेळी घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, राहुल पाचर्णे, रविंद्र काळे,महेश ढमढरे , भगवान शेळके , रामभाऊ सासवडे , अरुण गिरे , नवनाथ काकडे , राजेंद्र जासूद, स्वप्निल गायकवाड, सुधीर फराटे उपस्थित होते.