मुंबईत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार; सदस्य नोंदणी अभियानाला वेग देण्याचे राकेश वाघ यांचे आवाहन

54

समाजशील न्यूज नेटवर्क,मुंबई : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – बुधवार दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजता आयोजित एका विशेष कार्यक्रमात युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेत सहभागी झालेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी संघटनेच्या विविध कार्य व योजनांवर चर्चा करण्यात आली.


यापूर्वी २६ एप्रिल रोजी मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र सुर्यवंशी यांनी २७ एप्रिल ते १० मे या कालावधीत सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन केले होते. या कालावधीत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना २२ मे २०२६ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी संघटनेचे मुंबई,पालघर,ठाणे जिल्हा प्रभारी राकेश वाघ यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
कार्यक्रमात नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष धनेश रामलखानी, मुंबई युवा अध्यक्ष कुणाल शहा आणि मुंबई युवती अध्यक्षा शूनल नांगरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय महासचिव व मुंबई-पालघर प्रभारी राकेश वाघ, मुंबई महिला अध्यक्षा स्मिताताई बांद्रेकर, महिला उपाध्यक्षा जसविंदर सिंग राणा, उत्तर मुंबई जिल्हा सचिव राजेंद्र शेलार, उत्तर मुंबई महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई म्हस्के, कांदिवली पूर्व युवा कार्याध्यक्ष ताहिर शेख, गोरेगाव पूर्व युवा तालुका अध्यक्ष गोपाल चौधरी, बांद्रा पूर्व तालुका अध्यक्ष श्रीकांत राणे, जोगेश्वरी पूर्व तालुका अध्यक्षा शमिका सावंत, दहिसर पूर्व तालुका कार्याध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सदस्य नोंदणी अभियान अधिक प्रभावीपणे राबवून संघटना मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *