शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र राज्य शिव आनंद रस्ता चळवळ कृती समिती शिरूर तालुका यांच्या वतीने, गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले शिव रस्ते शेत रस्ते पानंद शिवार रस्ते तसेच शेतावर जाण्याचे पायमार्ग कालबद्ध कार्यक्रमानुसार खुले करण्यासाठी बैठकीबाबत शिरूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच तहसील कार्यालयावरील प्रलंबित शेत रस्ता केसेस तातडीने निकाली काढावेत, त्याचप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे नकाशे वरील शेत रस्त्यांच्या मोजणी व पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी करणे व तहसील कार्यालयात तहसीलदारांसमवेत शेत रस्त्यांसंबंधीत विभागांसोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक घेऊन शेत रस्त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तर या प्रश्न बैठक 3 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात यावी व शिरूर तालुक्यातील शिवपानंद रस्ते तातडीने खुले करून शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती यावेळी करण्यात आली. यावेळी मिठठुशेठ गदादे, विजय शेलार, सुभाष पाचर्णै, दत्ता येवले, उल्हास सोनवणे, योगेश भोस रमेश साळुंखे उपस्थित होते.
Home बातम्या पुणे शिरूर मधील शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यात येणेबाबत तहसीलदारांना निवेदन
शिरूर मधील शेतकऱ्यांना दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यात येणेबाबत तहसीलदारांना निवेदन
BySamajsheelFebruary 3, 20250
395