समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे ; (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील ग्रामीण कलाकार,अभिनेता सचिन अर्जुन शिंदे हे लवकरच तुझं वेड लागलं या मराठी चित्रपटात विशेष सह कलाकार म्हणून भूमिका साकारताना पाहावयास मिळणार आहेत. तशा आशयाचे शीतल फिल्म्स प्रॉडक्शन,मुंबई यांचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाल्याचे त्यांनी सा.समाजशीलशी बोलताना सांगितले. मराठी चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सचिन शिंदे या हुरहुन्नरी कलाकाराची प्रथमच निवड झाल्याने कवठे येमाईत त्यांच्या चाहत्यामधून व तरुण वर्गात जल्लोष साजरा होत आहे.
अत्यंत जेमतेम परिस्थितीत शिक्षण घेतलेले सचिन शिंदे यांना अगदी लहानपणापासूनच छोटे मोठे अभिनय,भूमिका,उत्कृष्ठ निवेदक म्हणून काम करण्याची आवड असल्याने ते सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत.त्यांनी अनेक छोट्या मोठ्या पटकथांमध्ये ही सर्वांग सुंदर अभिनयाच्या भूमिका यशस्वीपणे साकारताना रसिक प्रेक्षकांची माने जिकंलेली आहेत.गरीब मुलांनी ही शाळा शिकावी म्हणून त्यांनी त्यांच्या वस्तीवर सायकलवर जाऊन समाजप्रभोधनरुपी शिक्षकाची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. आपल्याकडे असलेल्या कला अविष्कारावर नितांत प्रेम करीत जोपासना करणारे ग्रामीण कलाकार सचिन शिंदे यांची आता चित्रपटात काम करण्यासाठी निवड झाल्याने त्यांनी घेतलेल्या अखंड मेहनतीस त्यांना फळ मिळाल्याचे गौरवोद्गार युवा क्रांती फौंडेशन अंतर्गत,पोलीस मित्र,ग्राहक पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रमुख,मार्गदर्शक जेष्ठ उपसंपादक पत्रकार सुभाष अण्णा शेटे यांनी काढले आहेत, तर युवा क्रांती फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक,अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी,राष्टीय तक्रार समिती प्रमुख हभप नाना महाराज कापडणीस,राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीदादा शेलार,राष्ट्रीय सल्लागार डॉ.राजेश्वर हेंद्रे,राष्ट्रीय महिला अध्यक्षा जयश्रीताई अहिरे,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वसुधाताई नाईक, श्रीमती वर्षा नाईक,पश्चिम महाराष्ट्र महिलाअध्यक्ष तथा राष्ट्रीय किसान विकास मंच पश्चिम महाराष्ट्र संघटक ,शिंदे यांचा मित्रवर्ग व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदे यांचा मित्रवर्ग व ग्रामस्थांनी अभिनंदन करीत त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.