समाजशील न्यूज नेटवर्क : शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) – दीपावलीच्या धनत्रयोदिवशी केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आरोग्यास विशेष फलदायी ठरणारे आयुर्वेदिक शतावरी कल्प चूर्ण विनाशुल्क देण्याचा विधायक संकल्प केलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,आयुर्वेदाचार्य डॉ.चेलना सावळे,जैन यांनी नुकत्याच झालेल्या बालदिनी शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या गावठाणातील अंगणवाडी अर्थात बालमंदिर येथे उपस्थित असलेल्या सुमारे २० बालकांना,सेविका,कार्यकर्ती,पालकांना शतावरी कल्प घेण्यामागील महत्व,शारीरिक फायदे विशद करीत सर्वांना शतावरी कल्प देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार,समाजशील न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक तथा युवाक्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष अण्णा शेटे,आयुष्यमान आरोग्य मंदिर कवठे येमाईच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. चेलना सावळे-जैन,आरोग्य सहाय्यक संदीप कुंजीर,अधिपरिचारीका विदया लोखंडे,आशा स्वयंसेविका अर्चना उघडे,औषध निर्माण अधिकारी,आरोग्य सहायिका सुनीता अक्का जगदाळे,अंगणवाडी सेविका साधना सांगडे,मदतनीस मनीषा चव्हाण व अनेक माता पालक उपस्थित होते.
यावेळी आयुर्वेदिक शतावरी कल्प ची सविस्तर माहिती डॉ.चेलना सावळे,जैन यांनी उपस्थितांना सांगितली. हे कल्प नियमित दुधाबरोबर सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते, मेंदूच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होते,फ्री रॅडिकल्सच्या प्रभाव कमी करण्याचे कार्य आहे, व्हायरल संक्रमणा पासून संरक्षण मिळते,अँटिऑक्सिडंट,धातू पुष्टी साठी
हार्मोन संतुलन,मूत्रमार्ग गुण,समग्र स्वास्थ समर्थनाचे कार्य हे कल्प करते. हे कल्प सेवन मुलांची हाडे बळकट होण्यास मदत मिळते.
शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून येते. मुलांच्या बुद्धीला चालना मिळते, शतावरी कल्प मुलांना दुधातून द्यावे इत्यादी माहिती डॉ.सावळे ,जैन यांनी दिली. तर बालदिना निमित्त आयुर्वेदाचे महत्त्व सांगत डॉक्टर चेलना यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली.